शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 05:41 IST

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली.

नाशिक/नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्य सरकार विरोधकांकडून घेरले जात असतानाच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडे होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शुक्रवारी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शनिवारी टीकेची झोड उठली आहे. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली.

अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले ते माहीत नाही. मात्र, सरकार म्हणून मी शेतकऱ्यांची माफी मागतो. फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे सांगितले.शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर कोकाटे यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ शेअर केला. त्यावर शनिवारी बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे नुकसान भरपाई दिला जाईल.

उपस्थित शेतकऱ्यांमध्ये माझे जवळचे मित्र होते. त्यांच्याशी मी थट्टामस्करीत बोललो. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शेतकऱ्यांवर कर्जाची वेळच येऊ नये. शेतकरी समृद्ध व संपन्न झाला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ज्या गोष्टी दाखवायच्या नाहीत त्या जाणीवपूर्वक दाखवतात.माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

काय म्हणाले कृषिमंत्री ?कोकाटे यांनी माडसांगवी (जि. नाशिक) येथे नुकसान पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातील संवाद पुढीलप्रमाणे..एका शेतकऱ्याचा प्रश्न - उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कर्जमाफी होऊ शकत नाही. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही?कोकाटे - कर्ज घ्यायचं, पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्ज भरायचं नाही. मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात, त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा...

नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून मदत देणारअवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. एकही शेतकरी सुटू नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. नागपूर व अमरावती जिल्ह्यामधील नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. राज्यातसुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार