शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- कृषिमंत्री दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 19:32 IST

निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याच्या दरात घसरण; कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला

- हितेन नाईकपालघर:- केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याचे भाव 1 हजार 500 रुपयाने गडगडले असून केंद्राचा हा निर्णय म्हणजे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची खरमरीत प्रतिक्रिया कृषिमंत्री दादा भुसे ह्यांनी पालघर येथे लोकमतशी बोलताना दिली.केंद्र सरकारने विदेश व्यापार कायदा 1992 अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आताच्या घडीला राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपयापासून ते 2 हजार 500 रुपये पर्यंत भाव मिळत होता. देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात 75 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यातून कांदा निर्यात होतो त्यापैकी 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकरी बांधवांचा आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या मिळालेल्या उत्पन्नांतून आता कुठे चांगले पैसे शेतकऱ्यांच्या खिशात पडत असताना दुर्दैवाने केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घोषित केला. काल-परवा हा निर्णय घोषित केल्यानंतर कांद्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांनी गडगडले. हा निर्णय हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी लोकमत'शी बोलताना पालघरमध्ये सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी विनंती करण्यात आली आहे. येणाऱ्या कालावधीत केंद्राला याचा विचार करावा लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल असे स्पष्ट मत कृषिमंत्री यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर कृषिमंत्री म्हणून आपली भूमिका काय असेल या उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्राने जर ऐकले नाहीतर शेतकऱ्यांना आधी मिळणारा दर आणि निर्यात बंदी च्या घोषणेनंतर मिळणाऱ्या दरात जो नुकसानीचा फरक असेल त्या फरकाचा मोबदला केंद्राने शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी माझी मागणी असल्याचंही कृषी मंत्र्यांनी सांगितले.कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला घेरण्यासाठी कोरोनाचे बळी लपवत असल्याचा आरोप झाल्यानंतर सुशांत राजपूत, रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत आदी प्रश्नांची भाजपने रान उठवले. त्यातून विशेष काही हाती न लागल्याने कांद्याच्या निर्यात बंदीचा प्रश्न निर्माण करण्यात आला आहे का? या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देण्याचे कृषी मंत्र्यांनी टाळले. 

टॅग्स :onionकांदा