शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल !

By admin | Updated: August 19, 2016 18:54 IST

राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढत असून, यावर्षी बीएससी कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असेलल्या १४,७४७ जागांंसाठी तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

साडे चौदा हजार जागांसाठी ६९ हजार अर्ज ; प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यातऑनलाइन लोकमतअकोला, दि. १९ : राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढत असून, यावर्षी बीएससी कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असेलल्या १४,७४७ जागांंसाठी तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. कृषी अभ्यासक्रसाठी स्पर्धा वाढल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. २३ केंद्रावर सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातंर्गत शासकीय २,७७४ जागा आहेत तर खासगी कृषी महाविद्यालयातंर्गत १२ हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत शासकीय ७५५ तर खासगी महाविद्यालयाच्या २,३४० एवढी प्रवेश क्षमता असून,अहमदनगर जिल्हयातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ८४४,खासगी ४,५७० परभणीच्या स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत ७९२, खासगी महाविद्यालया आणि कोकणात दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३५६ तर खासगी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १,५५० एवढी आहे.

कृषी पदवीसाठी कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या शास्त्र, वनविद्या शास्त्र,कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन यासह अनेक विषय आहेत.यामध्ये कृषी या विषयासाठी विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा आहे. राज्यात कृषी अभ्यासक्रमाचे ९२ महाविद्यालय असून, १९ शासकीय तर ७३ महाविद्यालये खासगी आहेत.शासकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २ हजार १२ तर खासगी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ही ७,२९० एवढी आहे. म्हणजेच एकूण १४,७४७ जागांमध्ये ९,३०२ जागा कृषीच्या आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी व स्पॉट अ‍ॅडमिशनसाठी यावर्षी खासगी शासकीय महाविद्यालयांना जोडण्यात आली आहेत.येत्या तीन दिवसात प्रवेश प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. याकरिताच खासगी महाविद्यालयाचे प्रवेश कृषी विद्यापीठांच्या शासकीय महाविद्यालयातून केले जात आहेत.