शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुठे वारकऱ्यांना मोफत दूध; तर कुठे विद्यार्थ्यांमध्ये दुधाचं वाटप; आंदोलकांकडून दूध सत्कारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 21:05 IST

दुधाची नासाडी टाळत दूध उत्पादकांचं अनोखं आंदोलन

सातारा- दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांची दरवाढ देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान एकीकडे दुधाचे टँकर रस्त्यावर रिकामे जात असताना, दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या जात असताना, दुसरीकडे मात्र काही दूध उत्पादकांनी अनोख्या पद्धतीनं आपला निषेध व्यक्त केला. वाळवा येथे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असणारं दूध स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडे जमा केलं. या दुधाचं वाटप कार्यकर्त्यांकडून गोरगरीबांमध्ये करण्यात आलं. याशिवाय झोपडपट्ट्यांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही दुधाचं वाटप करण्यात आलं. खटावमधील उंबर्डेतील दूध उत्पादकांनी दूध संकलन करुन दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना गरम दुधाचं वाटप केलं. तर शिरगावमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शाळेत आणि गावात 200 लिटर मसाला दूध वाटलं. इचलकरंजीतील झोपडपट्टी परिसरातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दुधाचं वाटप करण्यात आलं. कवठेमहांकाळमधील कुची येथे हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर उरलेल्या दुधाचं मोफत वाटप करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यभरात एल्गार पुकारला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे पहिल्या दिवशी दूध पुरवठ्यावर परिणाम झाला नसला, तरी दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाmilkदूधFarmerशेतकरी