शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे आयुक्त कार्यालयावर अभियोग्यता धारकांचा मोर्चा; रखडली २४,००० जागांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 01:12 IST

मुंबई : राज्यात शिक्षक भरतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संतप्त अभियोग्यता धारकांनी थेट पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा ...

मुंबई : राज्यात शिक्षक भरतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संतप्त अभियोग्यता धारकांनी थेट पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. १२ फेब्रुवारी रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर बेरोजगार अभियोग्यताधारक धडक मोर्चा काढणार आहेत. या धडक मोर्चात सहभागी होण्यास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून किमान १,००० अभियोग्यताधारक येतील, अशी माहिती या मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहणारे अभियोग्यता उमेदवार कल्पेश ठाकरे यांनी दिली आहे.राज्यात डी. एड आणि बी.एड झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे. शिक्षक भरतीसाठीपरीक्षा घेऊन १४ महिने उलटले, तरी घोषित केलेल्या २४,००० जागांची भरती होत नाही. म्हणून बेरोजगार अभियोग्यताधारकांमध्ये भयंकरसंताप आहे. या संतापाचाच परिणाम हा मोर्चा असणार असल्याचे अभियोग्यताधारकांनी म्हटले आहे. शिक्षण विभागाकडून १५ जिल्ह्यांत शिक्षकभरती पहिल्या टप्प्यातजाहीर केली आहे. मात्र, आमची मागणी सर्व जिल्ह्यांतील रिक्तपदे एकाच वेळी भरावीत अशीआहे. त्यामुळे सनदशीर मार्गानेच,पण आक्रमकपणा ठेऊन आम्ही आयुक्त कार्यालयावर धडकणार आहोत, असे कल्पेश ठाकरे यांनी सांगितले.समाजमाध्यमांतून व्यक्त होतोय असंतोषटिष्ट्वटरसारख्या समाजमाध्यमांमध्ये शिक्षकभरतीच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा सुरू असून, प्रक्रियेबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. टिष्ट्वटरवर शिक्षक भरती असे स्वतंत्र हँडल कार्यरत असून, शिक्षकभरती फसवणूक, शिक्षकभरती २४,०००, शिक्षकभरती पैसा जिंकला गुणवत्ता हरली असे हॅशटॅग मोठा प्रमाणात वापरले जात आहेत. त्यात मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य करून टिष्ट्वट केले जात आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षक