बारामती : सहकार चळवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी मोडीस काढली. राज्यात आता भाजपाप्रणीत महायुतीचे सरकार आले आहे. सरकारमध्ये असलो, तरी या सरकारने काही चुकीचे निर्णय घेतले तर रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
बारामतीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली. सहकारी साखर कारखाने बंद पाडून कमी किमतीने विकले. त्यातील अनेक कारखाने याच पक्षाच्या नेत्यांनी विकत घेतले आहेत. राज्यात सत्ता बदल करण्यामध्ये आमच्या सारख्या घटक पक्षांचाही खारीचा वाटा आहे. त्यामुळे या सरकारकडून शेतक:यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रसंगी आम्ही विरोधात आंदोलन करू. परंतु, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. कारण आमची गा:हाणी ऐकण्यासाठी वेगळी यंत्रणा करा, या मागणीचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे शेतक:यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
घोटाळ्यांची चौकशी होणारच
आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यासह सर्वच घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची आमची मागणी कायम आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.