शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 05:52 IST

सर्वोच्च न्यायालयात सोमवारला अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी होती. ही सुनावणी आता ३ ऑगस्टला होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कोणता यावर आता खल सुरू झाला आहे. 

- सुरेश भुसारी लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकालात निघण्याची एवढ्यात शक्यता नसल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचे करायचे काय? या प्रश्नाभोवती सध्या चर्चा सुरू आहे. यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शनिवारी रात्री चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारला अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी होती. ही सुनावणी आता ३ ऑगस्टला होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कोणता यावर आता खल सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारला पंजाबच्या दौऱ्यावर होते. ते रात्री तेथून आले. त्यांचे विमान साधारणत: दिल्लीतील पालम विमानतळावर उतरते. याचवेळी औरंगाबाद येथून मुख्यमंत्र्यांचे विमान दिल्लीत आले. केंद्रीयमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर रात्री  चर्चा केल्याचे सांगण्यात आले. 

अपात्रतेच्या याचिकांमुळे भाजप नेतृत्वासमोर प्रश्नअपात्रतेच्या याचिकांवर कोणताही निर्णय लागलेला नसल्याने या बंडखोर आमदारांचे करायचे काय? हा मुख्य प्रश्न भाजपच्या नेतृत्वासमोर आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यास असंतोषाचा भडका उडू शकतो.  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्याची घटनात्मक जबाबदारी शिंदे सरकारला पार पाडावी लागणार आहे. यामुळे मंत्रिमंडळात किमान सदस्य असण्याची आवश्यकता आहे. एक महिना झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने आमदारांमध्येही धाकधूक वाढली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाह