शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचा मृतदेह घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 06:08 IST

सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/धुळे : सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून, सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे उभारण्यात येणाºया सौरऊर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणारे विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील (वय ८०) यांनी, २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मा पाटील यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र, वडिलांना योग्य न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र्र पाटील यांनी घेतली होती. हे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच, घाईघाईत पत्रकार परिषद घेत, या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसे लेखी आश्वासन पाटील कुटुंबीयांना देण्यात आले, तर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जे. जे. रुग्णालयात जाऊन नरेंद्र पाटील यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या घडामोडीनंतर नातेवाईक धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन धुळ्याकडे रवाना झाले.हत्येचा गुन्हा दाखल कराहे सरकार गेंड्यांच्या कातडीचे असून, शेतकºयांना न्याय देऊ शकत नाही. या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकाºयांना तातडीने निलंबित केले पाहिजे.- धनंजय मुंडे,विरोधी पक्षनेते, विधान परिषदधर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून, या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे.- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलFarmerशेतकरी