शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अथक प्रयत्नांनंतर धोम धरणात बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 12:33 IST

मुक्कामाचे सर्व साहित्य टेंटमध्ये ठेवल्यानंतर हे चौघेही सायंकाळी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना सुमजित हा गाळात रुतून बुडत असल्याचे अवनिसला दिसले. अविनस हा सुमजितला वाचवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, तोही गाळात रुतू लागला. अशा अवस्थेतही तो सुमजितला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु  अवनिसला सुमजितने घट्ट मिठी मारली.

वाई : वाई तालुक्यातील धोम धरणात बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह रविवारी सकाळी दहा वाजता सापडले.  सुमजित शहा (वय २५, रा. कोलकाता), अवनिश श्रीवास्तव (२७, रा. गाजियाबाद, दिल्ली) अशी मृत युवकांची नावे आहेत.   मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चमध्ये संशोधन कार्यात सक्रिय असलेले सुमजित शहा, अवनिस श्रीवास्तव,  समीर त्रिदिवेसकुमार मिश्रा (३१ रा. उत्तर प्रदेश ), श्रीकांत सचितानंद मूर्ती ( ३० रा. आंध्रप्रदेश ) हे चौघे वाईच्या धोम धरण परिसरात शनिवारी फिरण्यासाठी आले होते. त्यांना हा परिसर आवडल्याने त्यांनी धोम धरणाच्या बाजूला असलेल्या आकोशी आणि कोंडवली या गावांच्या मध्यभागी टेंट लावले. त्या ठिकाणीच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुक्कामाचे सर्व साहित्य टेंटमध्ये ठेवल्यानंतर हे चौघेही सायंकाळी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना सुमजित हा गाळात रुतून बुडत असल्याचे अवनिसला दिसले. अविनस हा सुमजितला वाचवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, तोही गाळात रुतू लागला. अशा अवस्थेतही तो सुमजितला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु  अवनिसला सुमजितने घट्ट मिठी मारली. त्यामुळे दोघेही धरणाच्या पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी शोध कार्य सुरू केले. परंतु अंधार अन् कडक थंडीमुळे ही मोहीम रात्री अकरा वाजता थांबविण्यात आली. रविवारी पहाटे सहा वाजता ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमजित शहा आणि अवनिश श्रीवास्तव या दोघांचेही मृतदेह शोधण्यात ट्रेकर्सच्या जवानांना यश आले.