शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

तीन रुपये दरवाढीनंतरही दूध आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 6:14 AM

राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले.

पुणे/कोल्हापूर/सोलापूर : राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले. तीन रुपये दरवाढीचा प्रस्ताव देणारे दूध भुकटीच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांनीच भाव पाडला आहे. केंद्राने वेळेवर निर्णय न घेतल्याने भुकटीचे भाव पडले. मात्र कंपन्यांना अजूनही काही फायदे मिळण्याची शक्यता असून दुधाला प्रतिलिटरमागे १२ रुपये वाढ होऊ शकते. मात्र त्यानंतरही उत्पादकांना केवळ तीन रुपये वाढ देतात, असे शेट्टी म्हणाले.>ग्रामदैवतांना अभिषेक; ‘स्वाभिमानी’ रस्त्यावररविवारी रात्री १२ वा. ग्रामदैवतांना अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दूध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी रविवारी दुपारी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. त्यांच्याकडून शपथपत्रे लिहून घेतली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टॅँकर फोडून दूध रस्त्यावर सोडून दिले.दूध संकलन आज बंदपश्चिम महाराष्टÑातील सर्वच संघांनी सोमवारी दूध संकलन बंदचा निर्णय घेतला आहे. ेएक दिवसआधीच संघांनी दूध संकलन बंद ठेवले.एकूण ५ रुपये दरवाढसरकारने दुधाच्या भुकटीला अनुदान देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे.शहरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने उपाययोजना केली आहे. प्रसंगी पोलीस बंदोबस्तात दुधाचे टँकर आणू.- महादेव जानकर, दुग्धविकास मंत्री>मुंबईचा पुरवठा वाढविलादूध संघाने दोन दिवस आधीच दुधाचा मुंबईला होणारा पुरवठा वाढवून किमान दोन दिवस येथे दूधटंचाई भासणार नाही, याची काळजी घेतली आहे.>वरूड (अमरावती) : दूध दरवाढीच्या मुद्द्यावर आक्रमक होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दुधाचा टँकर पेटविण्याचा प्रयत्न करून आंदोलन छेडले. यामुळे दूध उत्पादक व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली.

टॅग्स :milkदूध