शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील धमाका लोकांना समजला आता दिल्लीतील धमाका केव्हा? राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 10:04 IST

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये १० सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

मुंबई - गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे अवघ्या ८ महिन्यांनंतर शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये १० सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यात  शरद पवार यांची पुढील पाच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.  विविध राज्यांच्या प्रदेश समित्यांनी शरद पवार यांच्याच नावाचे प्रस्ताव अध्यक्षपदासाठी पाठविले होते. यानुसार शरद पवार यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी शरद पवार यांचे नेतृत्व एकमेव पर्याय असल्याचा दावाही त्यावेळी अनेक नेत्यांनी भाषणांमध्ये केला होता.

दिल्ली प्रदेश काँग्रेसचा ठरावशरद पवार यांच्या नेतृत्वातच काम करणार असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सांगितले. शरद पवार यांनी नवा अध्यक्ष निवडीसाठी गठित केलेल्या समितीमध्ये धीरज शर्मा यांचाही समावेश आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाशिवाय पक्षाची कल्पना करता येणार नाही. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राजकारण सुरू केले आहे. यामुळे पवार यांनी नेतृत्व करावे, यासाठी दिल्ली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ठराव करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

दिल्लीतील धमाका केव्हा? राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी दोन धमाके होणार असल्याचे भाकीत केले होते. यापैकी एक मुंबईत व दुसरा दिल्लीत होणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. मुंबईतील धमाका लोकांना आज समजला आता दिल्लीतील धमाका केव्हा होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. 

दादागिरीची चर्चा शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर सभागृहात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. या निर्णयाची ये गप रे, तुला जास्त कळते का, बसून घ्या, कळत नाही का, सुप्रिया, तू बोलू नको, भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगू शकतो, अशी अजित पवारांची सुरू असलेली दादागिरी चर्चेचा विषय ठरली होती. रडारड करणाऱ्या, घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अजित पवार यांनी सुनावले. त्यांच्या या त्राग्यातून पत्रकारही सुटले नाहीत. जेव्हा त्यांच्या नाराजीचा प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवारांच्या या विधानाचे व्हिडीओ नंतर व्हायरल होत होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस