शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांनी तारीख जाहीर केली नाही पण..."; महायुतीची बैठक रद्द झाल्यानंतर राहुल शेवाळेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:25 IST

महायुतीची बैठक रद्द झाल्यानंतर माजी खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mahayuti Meeting : महाराष्ट्रात आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आज होणारी महायुतीची बैठक तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी जाणार असून ते उद्या परतण्याची शक्यता आहे. त्याआधी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची दिल्लीत अमित शहांसोबत सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीनंतर तिन्ही नेते मुंबईत परतले असून आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये विभागांची चर्चा करण्यासाठी मुंबईत मोठी बैठक होणार होती. आता या बैठकीबाबत शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अचानक एकनाथी शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी निघून गेल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आजची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवारी ते साताऱ्याहून परतल्यानंतर पुन्हा ही बैठक होणार असून त्यात उर्वरित सर्व विषयांवर चर्चा होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्वतंत्रपणे चर्चा केली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हेही शहा यांच्या घरी पोहोचले होते. सुमारे तीन तास ही बैठक सुरू असली तरी मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होऊ शकला नाही.

त्यानंतर महायुतीची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द झाल्यानंतर माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "गटनेत्यांच्या निवडीची तारीख त्यांनी घोषित केली नाही. गटनेत्यांच्या निवडीची तारीख घोषित होईल आणि त्यांचे निरीक्षक येतील त्यानंतर महायुतीची बैठक होईल. मला विश्वास आहे की येणाऱ्या एक दोन दिवसांत महायुतीची बैठक होईल. काल अमित शाह यांच्याबरोबर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत जी चर्चा झाली आणि ज्या प्रस्तावांवर चर्चा झाली त्यावर केंद्रीय नेत्यांकडून शिक्कामोर्तब होऊन दोन दिवसांत त्याची घोषणा होणार आहे. त्यानंतर महायुतीचा सरकार स्थापनेचा फॉर्म्युला घोषित होणार आहे," असं माजी खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं.

दरम्यान, दिल्लीतल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही रात्री उशिरा मुंबईत परतले. या बैठकीबाबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक चांगली आणि सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या नेत्यांची मुंबईत दुसरी बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी पुनरुच्चार केला की मुख्यमंत्रिपदासाठी कोणतेही अडथळे नाहीत आणि "लाडका भाऊ" हे त्यांच्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Shewaleराहुल शेवाळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस