शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

बीआरएसच्या महाराष्ट्र विस्ताराला धक्का; तेलंगणातील पराभवामुळे बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:20 IST

तेलंगणा हे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य. आपल्याकडील काही जिल्ह्यांच्या सीमा या राज्याला लागून आहेत.

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाचे बारसे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असे करून राष्ट्रीय पटलावर जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी पहिले पाऊल टाकले ते महाराष्ट्रात. मात्र, आज त्यांच्याच राज्यात त्यांचा दारूण पराभव झाल्याने महाराष्ट्रात आता विस्तार होण्याऐवजी संकोचाची शक्यता अधिक आहे. 

तेलंगणा हे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य. आपल्याकडील काही जिल्ह्यांच्या सीमा या राज्याला लागून आहेत. भाजप, काँग्रेससह काही लहान पक्षांचे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते, प्रमुख कार्यकर्ते यांना आपल्याकडे खेचण्याचे काम राव यांनी महाराष्ट्रात सुरू केले. बीआरएसमुळे कोणाला कुठे फटका बसणार याचे विश्लेषण सुरू झाले. तेलंगणामध्ये घेतलेले लोकाभिमुख निर्णय जाहिरातींच्या माध्यमातून राव यांनी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवले. मोठ्या सभादेखील घेतल्या. आमदार, मंत्र्यांसह पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन ते आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आले होते. 

माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य असे बरेच जण राव यांच्या गळाला लागले. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या पक्षाच्या असंतुष्टांना सोबत घेण्याची रणनीतीही या पक्षाने आखली होती. लोकसभा निवडणुकीत हाच फाॅर्म्युला वापरून आव्हान उभे करण्याची तयारी पक्षाने चालविली होती. मात्र, आता तेलंगणामधील पराभवामुळे ते बॅकफूटवर गेले आहेत. आता सत्ताहीन झालेल्या बीआरएसला या आघाडीवर अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

पराभवाचे कारणराव यांच्या पक्षात असलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्वत:च्या आमदार, खासदारांना न भेटणे, एककल्ली कारभार करणे यामुळे राव यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली. राव यांनी राबविलेल्या योजना जनहिताच्या होत्या, पण मनमानी करणे त्यांना पराभवाकडे घेऊन गेले असे ते म्हणाले.

तेलंगणामध्ये पराभव झाला म्हणून बीआरएसच्या विस्ताराला मर्यादा येतील असे मला वाटत नाही. के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात आणलेल्या लोकहिताच्या योजना महाराष्ट्रात राबविल्यास जनकल्याण होईल, अशी मोठी भावना लोकांमध्ये आहे. राव नक्कीच जोमाने परत येतील, त्यासाठीचा माार्ग महाराष्ट्रातून जाईल.- शंकरअण्णा धोंडगे, बीआरएस, महाराष्ट्र अध्यक्ष, माजी आमदार.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीMaharashtraमहाराष्ट्र