शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांच्या अटकेनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने पेढे वाटले, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:10 IST

शिवसैनिक प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत जात खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. राऊतांच्या अटकेनंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संजय राऊत याचा मला अभिमान आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी कौतुक केले. तर दुसरीकडे राऊत जेलमध्ये गेल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाहन चालकाने पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 

शिवसैनिक प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत जात खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. राजपूत यांनी श्रीकांत शिंदेंना पुष्पगुच्छ आणि पेढे दिले. संजय राऊतांच्या अटकेनंतर राजपूत यांनी आनंद व्यक्त केला. संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचं काम केले असा आरोप राजपूत यांनी केले. संजय राऊत जेलमध्ये गेले त्याबद्दल मी खूप खुश आहे. शिवसेना संपवण्याचं काम राऊतांनी केले असा गंभीर आरोप त्यांनी केला. मी १९९३ ते २००० पर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वाहन चालक होतो. संजय राऊत यांच्या चुकीच्या कामामुळे शिवसेना संपवली असा आरोप त्यांनी केला. 

पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय...महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, महाराष्ट्रावर हल्ले होतायेत पेढा वाटा, बेशरम लोक आहात तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. 

१० लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तब्बल ९ तास ईडीचे अधिकारी राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी होते. संजय राऊतांना ईडीने अटक केली. परंतु या प्रकरणात एक ट्विस्ट आला जेव्हा रविवारी संजय राऊतांच्या घरी ईडीने धाड टाकली. तेव्हा ११.५० लाख रुपये रोकड सापडले. यात १० लाखांच्या बंडलांवर एकनाथ शिंदे आणि अयोध्या असं नाव होते. शिवसैनिकांनी जमवाजमव करून हे पैसे गोळा केले होते. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौरा केला होता तेव्हा त्या खर्चाचे पैसे राऊतांकडे होते. हे पैसे पुन्हा पक्षात परत द्यायचे होते असं संजय राऊत यांच्या भावाने सांगितले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना