शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातलं कॉंग्रेसचं दुकान बंद होणार, राजीनामा दिल्यानंतर राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 4:47 PM

कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी आज कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह पक्षातील सर्वच नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. 

सिंधुदुर्ग, दि. 21 - कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी आज कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह पक्षातील सर्वच नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नसतानाही ते प्रदेशाध्यक्ष आहेत असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेसचं दुकान लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला. 

48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बट्याबोळ केला आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचं दुकान लवकरच बंद होणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस सोडतील असं राणे यावेळी म्हणाले .  

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले होते. त्यामुळे आज (गुरुवारी) राणे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी पक्षाला रामराम ठोकत कॉंग्रेससोबत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं.

नारायण राणेंच्या भाषणातील मुद्दे - 

तुम्ही काय मला काढणार मीच कॉंग्रेस सोडतो

संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा  करून पुढील निर्णय घेणार, नागपूरपासून माझ्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे 

शिवसेनेचे जवळपास 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

 काँग्रेसचं महाराष्ट्रातलं दुकान बंद होणार

 नितेश राणेंच काय काँग्रेस आणि शिवसेनेतीलही अनेक आमदार राजीनामा देतील 

 भाजपपुढे नाक घासतात, उद्धव ठाकरेंना नाकच नाही राहिलं

 दसऱ्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन मी माझी पुढची रुपरेषा स्पष्ट करेन

 नितेश राणेंबाबत योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ

महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही

सर्वात वरिष्ठ असूनही गटनेतेपद दिलं नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी रणपिसेंना गटनेता केलं

48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं

12 वर्षे काँग्रेसनं माझा उपयोग करुन घेतला 

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस सोडतील 

शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष रिकामे करणार

 महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो

आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते

अहमद पटेल म्हणाले, सहा महिने द्या मुख्यमंत्री करु

अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली 

काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार आहे

26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूल मंत्री म्हणून फिरलो

विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितलं ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही

 मला मँडमनं दोनदा सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार 

तीन वेळा मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं

 मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही

महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो

4 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली

 

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस