शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

हसन मुश्रिफांचं घर समजून भलत्याच व्यक्तीच्या घरावर ईडीची धाड, फजिती लक्षात आल्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 00:37 IST

Hasan Mushrif : हसन मुश्रिफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी करताना ईडीच्या पथकांकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. ईडीच्या पथकांनी हसन मुश्रिफांचं घर समजून एका भलत्याच व्यक्तीच्या घरावर छापा मारल्याचे समोर आले आहे.

माजी मंत्री आणि कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रिफ यांच्या निवासस्थानासह विविध मालमत्तांवर ईडीने धाड घातल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोपांचे सत्र रंगले होते. दरम्यान, हसन मुश्रिफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी करताना ईडीच्या पथकांकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. ईडीच्या पथकांनी हसन मुश्रिफांचं घर समजून एका भलत्याच व्यक्तीच्या घरावर छापा मारल्याचे समोर आले आहे.

ईडीच्या पथकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या कागल येथील निवासस्थानी बुधवारी पहाटे धाड टाकली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. मात्र यादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी एक चूक केली. ईडीचे अधिकारी हसन मुश्रिफ यांघे घर समजून एका उद्योगपतीच्या घरावर धाड टाकली. मात्र आणप चुकीच्या व्यक्तीच्या घरावर धाड टाकल्याचे लक्षात आल्यावर ई़डीच्या अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. कागल बरोबर कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरात बंगल्यात ईडीचे काही अधिकारी आले होते. मात्र शेजारील असलेल्या बंगल्यात त्यांनी प्रवेश केला, मात्र लवकरच ते माघारी गेले. दरम्यान, या ईडीच्या या चुकलेल्या धाडीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.

दरम्यान,  ईडी आणि आयकर विभागाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान नक्की काय सापडलं याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पण महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी मात्र ही राजकीय सूडबुद्धी असल्याचे म्हटले आहे. तसेच, याचा संबंध धार्मिक गोष्टींची आहे का, अशा आशयाची शंकाही व्यक्त केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीने छापा टाकला. त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार आहे, याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज बंद करण्याचा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले  होते.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliticsराजकारण