शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

Devendra Fadnavis: एकापाठोपाठ एक १४ ट्विट करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 3:04 PM

राष्ट्रवादी पक्षाचा संपूर्ण इतिहास पाहिला तर अशाच पद्धतीने जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॅार्ड आहे असं फडणवीस म्हणाले.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला आहे. राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) गुढी पाडवा मेळावा आणि उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर थेट जातीयवादाचे आरोप केले. इतकेच नाही तर शरद पवार(Sharad Pawar) हे नास्तिक असून ते मुस्लीम मते जातील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत असा आरोप केला होता. त्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. आता या वादात भाजपानेही उडी घेतली आहे.

भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांना चौफेर हल्लाबोल केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनी फडणवीसांनी पवारांना आंबेडकरी विचारांना बाजूला करत राष्ट्रवादी काँग्रेसचा जातीयवादी राजकारणाचा इतिहास आहे असं म्हटलं आहे. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देत फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० ला कडाडून विरोध होता, एका बाजुला आपण थाटामाटात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करतोय पण दुसऱ्या बाजुला त्यांच्या विचारांना बाजुला करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा विरोध होता. पण पवारांच यावर मत काय हे सर्वांनाच माहिती आहे. पवारांचे याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्य आलं तरी कसलही आश्चर्य नाही. त्यांच्या पक्षाचा संपूर्ण इतिहास पाहिला तर अशाच पद्धतीने जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॅार्ड आहे असं स्मरण करून राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानाचाही फडणवीसांनी समाचार घेतला. काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छबीला धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून? काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना केला.  

दरम्यान, संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला? अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, सच्चर समितीचा अहवाल लागू करा अशी मागणी केली. मुंबई बॉम्बस्फोटानंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे शरद पवारांनी खोटे सांगितले. नवाब मलिक यांना अटक होताच ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय असं पवार म्हणाले.  इशरत जहाँ ही निर्दोष होती असंही त्यांनी सांगितले होते. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी प्रयत्न केले. २०१२ मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही असा आरोप करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा