शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यापाठोपाठ आता गटारेही होणार मोकळी!

By admin | Updated: August 5, 2016 03:08 IST

शहराच्या विविध भागांत रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या

ठाणे : शहराच्या विविध भागांत रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या; अरुंद असलेल्या कल्व्हर्टमुळेच पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला. परंतु, गटारांमधून पाण्याचा निचरा न झाल्याने ही वेळ आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गटारावरील बांधकामांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरपासून अशा सर्व बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.घोडबंदर भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांमध्येही गुडघाभर पाणी साचले होते. काही ठिकाणी मोठे कल्व्हर्ट, तर काही ठिकाणी छोटे कल्व्हर्ट अशामुळे या भागात पाणी साचल्याची माहिती आता समोर आली आहे. गटारातील गाळ सध्या काढण्याचे काम सुरू असून यामधून बाटल्यांसह इतर साहित्य बाहेर काढले जात आहे. गटारांची सफाईच वेळेत न झाल्याने ही वेळ आल्याचेही आता बोलले जात आहे. परंतु, काही ठिकाणी गटारांवरच असलेल्या बांधकामांमुळे गटारातील घाण काढणे शक्य होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच पावसाळ्यानंतर गटारावरील बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी नाल्यावरील बांधकामे तोडण्याची मोहीम पालिकेने राबवली. अनेक नाल्यांवरील बांधकामे पाडण्यात आली. त्याचाच आधार घेत जी बांधकामे संपूर्णपणे गटारावर असतील, त्यांच्यावर सुरुवातीला हातोडा टाकला जाईल. >आधी होणार सर्वेक्षणठाण्यातील कोणकोणत्या भागात गटारावर अशा प्रकारे किती बांधकामे आहेत, याचा सर्व्हे येत्या काही दिवसांत केला जाणार आहे. त्यानंतर प्रभाग समितीनिहाय या बांधकामांवर हातोडा टाकण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर खाडीच्या आतमध्ये शिरकाव करून अतिक्रमण झालेल्या बांधकामांवरदेखील हातोडा टाकण्यात येणार आहे.