मुंडेच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात बंद

By Admin | Updated: June 3, 2014 16:18 IST2014-06-03T13:37:17+5:302014-06-03T16:18:15+5:30

गोपीनाथ मुंडेच्या निधनानंतर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

After the demise of Munde, close to Beed district | मुंडेच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात बंद

मुंडेच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात बंद

 ऑनलाइन टीम

बीड, दि. ३ - केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त येताच मुंडेचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये दुकाने बंद करण्यात आली. सध्या मराठवाड्यातील बहुसंख्य शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत अपघाती निधन झाले. या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मराठवाड्यातील बहुसंख्य सदृष परिस्थिती असून दुकाने बंद करण्यात आली आहे. यामुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  

Web Title: After the demise of Munde, close to Beed district