जगात दुसऱ्यांदा फाशीनंतर शवविच्छेदन !

By admin | Published: July 31, 2015 04:10 AM2015-07-31T04:10:06+5:302015-07-31T04:10:06+5:30

याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी फाशी दिल्यानंतर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच फाशीनंतर शवविच्छेदन करण्याची

After the death penalty for the second time in the world! | जगात दुसऱ्यांदा फाशीनंतर शवविच्छेदन !

जगात दुसऱ्यांदा फाशीनंतर शवविच्छेदन !

Next

- सुमेध वाघमारे,  नागपूर
याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी फाशी दिल्यानंतर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच फाशीनंतर शवविच्छेदन करण्याची घटना घडली. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) न्यायवैद्यकशास्त्र विभागाने ही जबाबदारी पार पाडली. इंग्लंडमध्ये १८५५मध्ये जॉर्ज केली याला फाशी देण्यात आली. त्यावेळी पॅथालॉजी विभागाच्या एका डॉक्टरने जॉर्जचे शवविच्छेदन केले.
फाशीनंतर केलेले हे जगातील पहिले शवविच्छेदन होते. फाशी यार्डपासून काही अंतरावर कापडी तंबूत शवविच्छेदनाची तयारी करण्यात आली होती. बुधवारी रात्री शवविच्छेदनाचे दोन टेबल, एक पोर्टेबल एक्स-रे मशिन व इतर साहित्य कारागृहात आणण्यात आले, तर फाशीच्या दिवशी पहाटे ४ वाजता न्यूरोलॉजीची उपकरणे पोहोचविण्यात आली. साधारण दीड तास चाललेल्या शवविच्छेदनात मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह न्यूरोलॉजी, आॅर्थाेपेडिक्स, अ‍ॅनाटॉमी, रेडिओलॉजी व पॅथालॉजी विभागाचे एक डॉक्टर, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे दोन डॉक्टर व एक तंत्रज्ञ असा ताफा होता.

Web Title: After the death penalty for the second time in the world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.