शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

तब्बल सहा दशकांनंतर बदलणार सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती; मुख्यमंत्र्यांची सुशासन प्रणालीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 11:04 IST

या सुशासन नियमावलीत वातावरणीय बदल आणि त्याचे परिणाम याचादेखील समावेश करण्यात आला आहे. उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून राज्य कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 

मुंबई : राज्यातील विविध सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती तब्बल सहा दशकांनंतर आता बदलली जाणार असून गतिमानता व पारदर्शकतेवर भर असलेल्या सुशासन प्रणाली २०२३ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मान्यता दिली. 

राज्यात १९६३ मध्ये कार्यालयीन कार्यपद्धतीची पहिली नियमावली तयार करण्यात आली होती. तिचा मराठी अनुवाद १९९४ मध्ये करण्यात आला होता. शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरीत्या मिळावा. यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालावी व अन्य राज्यांसाठी आदर्श ठरेल, अशी सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्या होत्या. त्यासाठी निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन यांची समितीही नेमण्यात आली होती. समितीने ४३ बैठका घेतल्या, ३५ विभागांना भेटी दिल्या व अहवाल तयार केला. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी समितीच्या अहवालाचे  सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर केले.

वातावरणीय बदलासाठी स्वतंत्र कक्षया सुशासन नियमावलीत वातावरणीय बदल आणि त्याचे परिणाम याचादेखील समावेश करण्यात आला आहे. उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून राज्य कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 

नियमावलीत काय आहे? -सरकारी सेवा नागरिकांना जलद व सुलभ मिळणार.-सुशासनाची कामगिरी तपासण्यासाठीचे १६१ निर्देशांक असतील. त्यावरून ही कामगिरी ठरविली जाईल.-एंड टू एंड ऑनलाइन सेवा कालमर्यादेत देण्याची सोय असेल. मानवी हस्तक्षेप संपविणार.-आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या व व्याप्ती वाढविणार.-शासकीय कामकाज ई ऑफिसद्वारे करणार.-सार्वजनिक कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येईल.-सध्या एक सरकारी फाइल सहा-सात टप्प्यांमधून जाते. ती यापुढे तीन ते चार टप्प्यांत निकाली काढली जाईल.-निर्णय प्रक्रियेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. 

टॅग्स :GovernmentसरकारEknath Shindeएकनाथ शिंदे