शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर जिल्ह्यातील ३० वाड्या उजळणार

By admin | Updated: September 24, 2015 00:29 IST

दीनदयाळ योजना : पायाभूत सुविधा निर्माण करणार--- नरेंद्र इंदुलकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर --स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही जिल्ह्यातील ३० वाड्या, वस्त्या, धनगरवाडे अंधारात आहेत. पायाभूत सुविधाच नसल्यामुळे ‘महावितरण’ची वीज तेथे जाऊन पोहोचलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या प्रशासनाने केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय योजनेतून वीज देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.जिल्ह्यात वाड्या, वस्त्या मिळून एकूण १२१७ गावे आहेत. यामध्ये १०२८ ग्रामपंचायती आहेत. दहा शहरे आहेत. शहरांतील सर्व वसाहतींमध्ये, उपनगरांत वीज आहे. मुख्य गावांतही वीज आहे; पण भुदरगड, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड या तालुक्यांतील वाड्या, धनगरवाडे विजेपासून वंचित आहेत. या वाड्यांत शंभरपासून पाचशेपर्यंत लोकसंख्या आहे. डोंगराळ प्रदेश, वन विभागाची जमीन, कमी लोकसंख्या या प्रमुख कारणांमुळे तिथे वीज गेलेली नाही. दरम्यान, केंद्र सरकारने दीनदयाळ उपाध्याय योजनेतून महावितरणच्या प्रशासनाने वीज नेण्यासाठी ३० गावांचा प्रस्ताव तयार केला आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी ३३ कोटी रुपये मिळणार आहेत. यातून ३० वाड्यांवर वीज पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. याशिवाय खराब झालेले विद्युत खांब व वाहिन्या बदलणे, नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविणे, आदी कामे केली जाणार आहेत. प्रस्तावांना मंजुरी मिळून निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. प्रत्यक्ष काम पूर्ण होऊन या उन्हाळ्यात वीज नेण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. जिल्ह्यातील ३० वाड्यांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दीनदयाळ योजनेतून प्रस्ताव दिले आहेत. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. - नरेंद्र इंदुलकर, अधीक्षक अभियंता, महावितरणवीज नसलेल्या वाड्या :भुदरगड - बेडीव धनगरवाडा, हेदवडे धनगरवाडा, गिरगाव धनगरवाडा, पाटीलवाडी सोनबाचा वाडा, हंड्याचा वाडा, यरंडपे धनगरवाडा, मेघोली धनगरवाडा, भाटवाडी, मळी, तळी, कलापूर. कागल - पाटील वसाहत. राधानगरी - धनगरवाडा (ब), हसनगाव धनगरवाडा एक, धनगरवाडा दोन, सावंतवाडी धनगरवाडा, पाटीलवाडी, येताळवस्ती, लिंधडे वस्ती, कोपाचा धनगरवाडा, हरिजन वस्ती. शाहूवाडी - धनगरवाडा एक, धनगरवाडा दोन, अंबाई धनगरवाडा, नाईकबाचा माळ. चंदगड - धनगरवाडा एक, धनगरवाडा दोन, बंदराई, नगरगाव. गडहिंग्लज -लमाणवाडा.