शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुम्ही कधी हाेय म्हणाला नसता; शरद पवारांचा सूर बदलाचा, स्वर माघारीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 06:12 IST

पवार कार्यकर्त्यांना म्हणाले... दोन दिवसांनी तुम्हाला असे बसावे लागणार नाही

 मुंबई - येत्या एक-दोन दिवसांत मी माझा निर्णय घेणार आहे. मात्र, हा निर्णय घेताना तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेवून अंतिम निर्णय घेतला जाईल. तो घेत असताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, असे सूचक विधान शरद पवारांनी गुरुवारी कार्यकर्त्यांशी बोलताना केले आहे. 

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर ठाण मांडत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही कार्यकर्ते इथे आंदोलनाला बसले होते. पवारांनी दुपारी त्यांच्यासमोर येऊन राजीनाम्यामागील भावना आणि पुढील निर्णयाबाबत भूमिका जाहीर केली. 

दोन दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही एवढी खात्री देतो, असे पवार यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. महाराष्ट्राबाहेरूनही अनेक सहकारी मुंबईत आले आहेत. मी त्यांच्याशी उद्या संध्याकाळपर्यंत चर्चा करणार आहे. ती चर्चा झाल्यानंतर जी तुमच्या सगळ्यांची भावना आहे ती नजरेसमोर ठेवून अंतिम निर्णय येत्या एक ते दोन दिवसात घेतला जाईल, अशा शब्दात पवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. 

...तर तुम्ही कधी हाेय म्हणाला नसता!पक्षातील सगळ्या सहकाऱ्यांची एकदंरीत जी तीव्र भावना आहे, ती तुमच्या रूपाने या ठिकाणी व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून तुम्ही आला आहात, तुम्ही तुमच्या भूमिकेसाठी अत्यंत आग्रही आहात. पक्षाच्या भवितव्यासाठी मी हा निर्णय  घेतला आहे. नवीन नेतृत्व शक्तिशाली करावे हा त्याच्या मागचा हेतू होता. असे निर्णय घेताना सहकाऱ्यांशी विचार विनिमय करण्याची आवश्यकता असते. पण मला खात्री होती, मी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हणाला नसता, असेही पवार यावेळी म्हणाले.

राजीनामा मागे घ्या, रक्ताने लिहिले पत्रराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख या आंदोलनात आघाडीवर असून त्यांनी पवार यांना उद्देशून रक्ताने पत्र लिहिले. ‘आदरणीय साहेब, विनंती आहे निर्णय मागे घ्या’, असा मजकूर मोठ्या अक्षरात लिहून शेख यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती या पत्रात केली आहे. 

देशभरातून दिग्गज विराेधी नेत्यांचे फोन शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आता देशभरातील नेतेमंडळींकडून त्यांना भावनिक साद घातली जात आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी फोनवरून त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे ज्येष्ठ नेते डी. राजा या नेत्यांनीदेखील फोन करून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस