शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

“मनोज जरांगे स्वतःला कोण समजतात, बॅरिस्टर की ॲटर्नी जनरल”; गुणरत्न सदावर्तेंची थेट विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 17:52 IST

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. याशिवाय कुणबी नोंदी आणि शिंदे समिती रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. यातच आता विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण होत आहे. विचारांची लढाई विचाराने लढायला हवी आहे. मनोज जरांगे पाटील खालच्या स्तरातून टीका करीत आहेत. सर्वांची लायकी काढत आहेत. आधी पोलिसांना लक्ष्य केले, आता आमदारांच्या जातीवर जाऊन बोलत आहेत. मनोज जरांगे स्वत:ला बॅरिस्टर समजतात की, ॲटर्नी जनरल, अशी विचारणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

आतापर्यंत कायदेशीर बाबीमध्ये जरांगे यांना बोलवले गेलेले नाही

आतापर्यंत कायदेशीर बाबीमध्ये मनोज जरांगे यांना बोलवले गेलेले नाही. मनोज जरांगे मग्रुरीतून बोलत आहेत, हुकूमशाहीतून बोलत आहेत. कोणाला मारून आणि गाड्या फोडून आरक्षण मिळत नाही. महाराष्ट्रातील वातावरण खराब केले आहे. मनोज जरांगे यांना कायद्याचे किती ज्ञान आहे, हे पाहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत सरकारने सोयी-सवलत दिली आहे. पण हे सर्वांचे लायकी काढत निघाले, हे चालणार नाही. बेकायदेशीर आंदोलन करण्याची तरतूद नाही, हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका सदावर्ते यांनी केली. 

दरम्यान, आंदोलन कसे करावे याविषयी नियम आहेत. तोडफोड जाळपोळ करणाऱ्याकडून दंड वसुली केली जाते. जोपर्यंत कायद्याच्या चौकटीत मनोज जरांगे यांना आणत नाहीत तोपर्यंत हे असेच चालू राहणार आहे. मनोज जरांगेच्या बाबतीत डेमोक्रॉसी नाही तर मोबॉक्रॉसी झाली आहे, या शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण