शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

म्हाडाच्या घरांसाठी बुधवारी जाहीरात

By admin | Updated: July 9, 2017 08:37 IST

सर्वसामान्यांना स्वस्तात घर उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीची जाहीरात बुधवार, 12 जुलै रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 9 - घरांच्या किमती गगनाला भिडल्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांची नजर म्हाडाच्या लॉटरीकडे असते. दरम्यान सर्वसामान्यांना स्वस्तात घर उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीची जाहीरात बुधवार, 12 जुलै रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.  
 म्हाडाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यंदाच्या लॉटरीसाठी म्हाडा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी म्हाडा कार्यालयातही बैठकांचे सत्र सुरू आहे. यंदा म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटासाठी 322, मध्यम उत्पन्न गटासाठी 226 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 168 अशा एकून 784 घरांची लॉटरी निघणार आहे.  मात्र यंदाच्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटाचा समावेश करण्यात आला नसल्याचे वृत्त आहे . पण अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरांचा शोध सुरू आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र यावर्षी म्हाडाच्या घरांच्या किमती वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 
 लॉटरी प्रक्रिया डिजिटल करण्याकडे म्हाडाचा कल 
सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण आपल्या लॉटरी प्रक्रियेत दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. विशेषत: अर्जदारांना अनामत रक्कम भरताना अडथळे येऊ नयेत म्हणून लॉटरी प्रक्रिया डिजिटल करण्याकडे म्हाडाचा कल अधिक आहे. याच प्रक्रियेंतर्गत यंदाच्या सदनिका सोडतीकरिता अर्जासोबत उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) व आॅनलाइन पेमेंटसह एनईएफटी व आरटीजीएस हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
(अधिक वाचा -  म्हाडाची ‘डिजिटल’ लॉटरी )    
म्हाडा सदनिका सोडतीसाठी आता एनईएफटी, आरटीजीएसचा पर्यायमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने यंदाच्या सदनिका सोडतीकरिता अर्जासोबत उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) व ऑनलाइन पेमेंटसह एनईएफटी (National Electronic Funds Transfer) व आरटीजीएस (Real Time Gross Settlelment) हा पर्यायही अर्जदार नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे,  अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे यांनी दिली.