शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 06:20 IST

मराठा समाजाला देण्यात आलेल्या १६ टक्के आरक्षणाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

मुंबई : मराठा समाजाला देण्यात आलेल्या १६ टक्के आरक्षणाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. वैद्यकीय प्रवेशांत (नीट) राज्यासाठीच्या कोट्यामध्येही मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचानालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांनी सांगितले.वैद्यकीय शासकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेअंतर्गत देश पातळीवर राज्यातील उमेदवारांकरिता राज्य कोट्यांतर्गत ८५ टक्के जागा राखीव असतात. आतापर्यंत वैद्यकीय किंवा उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात प्रवेश मिळू शकत नव्हता. त्यांच्यापैकी बºयाच जणांचा प्रगत वर्गात समावेश झाल्याने गुणवत्तेच्या कोट्यासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या स्पर्धेतही मराठा समाज मागे पडला असल्याची खंत व्यक्त केली जात होती. मात्र आता राज्याच्या ८५ टक्के कोट्यांतर्गत १६ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. देशपातळीवरील उर्वरित १५ टक्के कोट्यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार असल्याचे शिणगारे यांनी स्पष्ट केले.१६ टक्के आरक्षणाचा शासन निर्णय निघताच त्याची अंमलबजावणी होईल. उर्वरीत १५ टक्के देशपातळीवरील कोट्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणाºया जागांमध्ये त्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. तेथे स्पर्धा करावी लागेल, असेही शिणगारे म्हणाले.>दरवर्षी २ लाख अर्जराज्यातून दरवर्षी २ लाखाहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशांसाठी अर्ज करतात. त्यामध्ये शासकीय महाविद्यालयांत एमबीबीएसच्या एकूण ३११० जागा तर बीडीएसच्या २६० जागा यंदा उपलब्ध आहेत. खाजगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या १७२० तर बीडीएसच्या २३५० जागा आहेत. या जागांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.