शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. नार्वेकर भाजपचे विधानसभाध्यक्षपदाचे उमेदवार, मोठ्या धक्क्यानंतर आता आणखी धक्के! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 09:14 IST

नार्वेकर यांनी अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते.

मुंबई : संपूर्ण देशाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, असे समीकरण महाराष्ट्रात आल्यानंतर आता भाजपने आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पाेहाेचलेले ॲड. राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.नार्वेकर यांनी अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.४५ वर्षीय नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले. पूर्वी ते शिवसेनेमध्ये होते. नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. २०१४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढविली होती, पण ते पराभूत झाले. त्याचवर्षी त्यांची राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काहीच दिवस आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व कुलाबा मतदारसंघाचे आमदार झाले. 

सासरे सभापती, जावई अध्यक्ष-  भाजप-शिंदे गटाकडील संख्याबळ लक्षात घेता, नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जाते. -  या निमित्ताने एक वेगळाच योगायोग साधला जाणार आहे. नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक- निंबाळकर हे महाराष्ट विधान परिषदेचे सभापती आहेत. -  त्यामुळे सासरे विधान परिषदेचे सभापती, तर जावई विधानसभेचे अध्यक्ष असा अपूर्व योग जुळून येऊ शकतो. निंबाळकर यांच्या कन्या सरोजिनी या नार्वेकर यांच्या पत्नी आहेत.

भूकंपाचे धक्के मंत्रिमंडळ रचनेपर्यंतही पोहोचणार? राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी देत भारतीय जनता पार्टीने जे धक्कातंत्र अवलंबिले, ते मंत्रिपदांची संधी देतानाही वापरले जाईल, असे आता म्हटले जात आहे. त्यामुळे पक्षातील एक-दोन दिग्गज, प्रस्थापितांना विश्रांती दिली जाऊ शकते. मंत्रिमंडळात हमखास समावेश होणार म्हणून ज्यांची नावे माध्यमांतून दिली जात आहेत, त्यांना भूकंपाचा तडाखा बसू शकतो. विशेषत: नार्वेकर यांना अनपेक्षितरित्या संधी दिली गेल्याने प्रस्थापितांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरEknath Shindeएकनाथ शिंदेchandrakant patilचंद्रकांत पाटील