शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूल दत्तक घेणे झाले आता सोपे! जिल्हाधिकारीच देणार आदेश, विलंब टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 06:37 IST

मूल दत्तक घ्यायचे म्हटले तर महिनोन् महिने चालणारी आणि किचकट असलेली प्रक्रिया पूर्ण करताना दाम्पत्यांच्या नाकीनऊ येतात.

अविनाश साबापुरेयवतमाळ :

मूल दत्तक घ्यायचे म्हटले तर महिनोन् महिने चालणारी आणि किचकट असलेली प्रक्रिया पूर्ण करताना दाम्पत्यांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही मूल दत्तक घेत नाहीत किंवा कायदेशीर प्रक्रिया न करता मूल दत्तक घेतात. आता हा विलंब टाळण्यासाठी दत्तक विधानाची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. दत्तक प्रक्रियेतील न्यायालयीन विलंब टाळून थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच दत्तक आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत केंद्रीय महिला व बालविकास आयुक्तालयाने लेखी निर्देश जारी केले आहेत.

राज्यात दत्तक विधानाच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या प्रचंड वाढली आहे. न्यायालयातून आदेश येईपर्यंत सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागत असल्याने अनेकदा कायदेशीर प्रक्रिया टाळून गुपचूप मूल दत्तक घेण्याचे प्रकार घडतात. त्यातून संबंधित मुलाला दत्तक पालकांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळण्यात अडचणी येतात. आता मात्र न्यायालयीन प्रकरणांना फाटा देत संबंधित जिल्हाधिकारीच दत्तक आदेश बहाल करणार आहेत. ही प्रक्रिया केवळ एका महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या दत्तक प्रकरणांशी संबंधित सर्व प्रकरणे जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत. पूर्वीची दत्तक प्रक्रिया- ‘कारा’च्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी  लागत होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे येत होते. कक्षातर्फे दाम्पत्याच्या कागदपत्रांची तपासणी तसेच त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केल्यावर कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केली जात होती. - या कागदपत्रांचा ‘कारा’कडून सकारात्मक अहवाल आल्यास प्रकरण न्यायालयाकडे जात होते. सुनावणी झाल्यावर संबंधित मुलाचे कागदपत्रावरील नाव बदलणे, अन्य बदल करणे ही प्रक्रिया पार पाडली जात होती. नवी सोपी प्रक्रियाआता मूल दत्तक घेण्यास इच्छुक दाम्पत्य जिल्हा बाल संरक्षण कक्षात येऊन नोंदणी करतील. त्यासाठी कक्षाचे अधिकारी मदत करतील. कक्षाचे पथक सर्व बाबींची तपासणी करून आपल्या अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करतील. जिल्हाधिकारीच दत्तक आदेश जारी करतील. कागदपत्रे योग्य असतील तर ही प्रक्रिया ६० दिवसात पूर्ण होणार आहे.