शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

प्रशासकीय प्रमुखांवर राजकीय दबाव नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 8:31 PM

अमरावती : प्रशासकीय कारवाई टाळण्यासह मनाजोगी पोस्टिंग मिळवण्यासाठी बहुतांश अधिकारी-कर्मचा-यांकडून राजकीय दबावतंत्र वापरले जाते.

अमरावती : प्रशासकीय कारवाई टाळण्यासह मनाजोगी पोस्टिंग मिळवण्यासाठी बहुतांश अधिकारी-कर्मचा-यांकडून राजकीय दबावतंत्र वापरले जाते. प्रशासन प्रमुखांकडे राजकीय व्यक्तींकडून रदबदली करवून घेतली जाते. या दबावतंत्रावर सरकारने अंकुश आणला असून, असे आढळल्यास संबंधिताविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने सर्वच विभागप्रमुख व प्रशासन प्रमुखांना दिले आहेत.महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ मध्ये कोणताही शासकीय कर्मचारी त्याच्या शासकीय सेवेच्या कोणत्याही बाबीसंबंधी वरिष्ठ प्राधिकरणावर कोणताही राजकीय किंवा इतर बाह्य दबाव आणणार नाही, असे विहित करण्यात आले आहे. शासकीय कर्मचा-यांनी त्यांच्या सेवाविषयक तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी तसेच वैयक्तिक कामे करून घेण्यासाठी राजकीय कार्यकर्ते व अन्य अशासकीय व्यक्तींमार्फत दबाव आणल्याचे आढळून आल्यास ते शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतात. मात्र, त्यानंतरही अनेक अधिकारी-कर्मचा-यांकडून आपआपल्या राजकीय गॉडफादरकडून वरिष्ठ प्राधिकरणावर दबाव टाकला जातो. हे लक्षात आल्यानंतर २९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा सामान्य प्रशासन विभागाने कडक सूचना दिल्या आहेत.असे आहेत निर्देशकोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचा-याने त्याच्या सेवाविषयक बाबीसंदर्भात कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणावर दबाव आणल्याचे वा तसा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम त्याबाबत खुलासा घ्यावा. असा खुलासा करताना संबंधितांनी सक्षम प्राधिका-यास आपला अशा पत्रव्यवहाराशी संबंध नसून, त्याची दखल घेऊ नये, असे स्पष्टपणे कळविल्याखेरीज संबंधित अधिकारी-कर्मचा-यांविषयी प्राप्त झालेल्या शिफारशींची दखल घेऊ नये, अन्यथा संबंधिताची त्या शिफारशीस मूक संमती असल्याचे गृहीत धरून शिस्तभंग कारवाई करण्यात येईल.राजकीय किंवा बाह्य दबावाबाबत २००६ साली काढलेल्या सूचना व कारवाईचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. जीएडीने आखून दिलेली कार्यकक्षा अव्हेरल्यास शिस्तभंग कारवाई होईल.र.शि. घाटगेअवर सचिव, महाराष्ट्र शासन.