शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना आता मायबोलीतून शिक्षण, माडिया भाषेत अभ्यासक्रम तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 06:00 IST

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाषेची समस्या गंभीर असल्याने भामरागड तालुक्यातील काही शिक्षकांनी पहिल्या व दुसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे ‘माडिया’ भाषेत भाषांतर केले आहे.

- दिगांबर जवादेेगडचिरोली : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाषेची समस्या गंभीर असल्याने भामरागड तालुक्यातील काही शिक्षकांनी पहिल्या व दुसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे ‘माडिया’ भाषेत भाषांतर केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता माडिया व मराठी या दोन भाषांतून शिकविले जाणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाºयांनी दिली.आदिवासी समाज जंगलात व दुर्गम भागात वास्तव्यास आहे. या भागातील नागरिकांचा ग्रामीण भागाशी संपर्क येत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी व नागरिक माडिया मातृभाषेशिवाय इतर भाषा बोलत नाहीत व जाणतसुद्धा नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मराठीतून शिकविताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते.शिक्षक मराठी बोलतो. मात्र विद्यार्थ्यांना यातील काहीच कळत नाही. याचा परिणाम म्हणजे हे विद्यार्थी हुशार असूनही चाचण्यांमध्ये ते मागे पडतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील काही शिक्षकांनी पहिल्या व दुसºया वर्गाच्या अभ्यासक्रमाचे माडिया भाषेत भाषांतर केले आहे. केवळ माडिया भाषेत या विद्यार्थ्यांना शिकविल्यास भविष्यात हे विद्यार्थी मराठी भाषा जाणणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना माडिया व मराठी या दोन्ही भाषेतून शिक्षण दिले जाणार आहे. परिणामी हे विद्यार्थी मराठी भाषासुद्धा शिकणार आहेत.दोन भाषेतून शिकविताना शिक्षकांना चांगलीच तारेवरची कसरत होणार आहे. सर्वप्रथम त्यांना माडिया भाषा शिकावी लागणार आहे. शिक्षकांनी अध्यापन कसे करावे, याबाबतचे प्रशिक्षणसुद्धा भामरागड येथे २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत आयोजित केले आहे.माडिया, गोंडी या आदिवासींच्या बोलीभाषागडचिरोली जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा व छत्तीसगड या दोन राज्यांना जोडल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात तेलगू, बंगाली, छत्तीसगडी, माडिया, गोंडी, हिंदी व मराठी या भाषा बोलल्या जातात. यातील माडिया व गोंडी ही आदिवासींची भाषा आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र