शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आदिवासी जमीन संपादन ग्रामसभेच्या मान्यतेविना, बुलेट ट्रेनसह समृद्धी मार्ग, पेसा कायद्यानुसार बंधनकारक अट रद्द  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 05:37 IST

आदिवासांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा सरकारने आता त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. कारण मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांसाठी आदिवासी जमीन संपादित करताना,

- नारायण जाधवठाणे : आदिवासांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा सरकारने आता त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. कारण मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांसाठी आदिवासी जमीन संपादित करताना, पेसा कायद्यानुसार बंधनकारक असलेली ग्रामसभेची अटच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील आदिवासी भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासह एमएमआरडीएचा विरार-अलिबाग कॉरिडॉर लवकरात लवकर पूर्ण करण्याची सबब दाखवून व्हायटल प्रोजेक्ट अर्थात निकडीचे जनहितकारी सरकारी प्रकल्पांच्या नावांखाली अशा प्रकल्पांना लागणारी आदिवासी जमीन संपादनासाठी पेसा कायद्यानुसार बंधनकारक असलेली ग्रामसभेची अटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जमीन महसूल कायदा १९६६च्या कलम ३६ एमध्येही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. यामुळे आता अशा प्रकल्पांसाठी लागणारी आदिवासी जमीन शासन कोणत्याही प्रकारची जनसुनावणी अथवा ग्रामसभेचा ठराव मंजूर न करता त्यांना वाटेल तेव्हा व वाटेल तितकी संपादित करू शकणार आहे. याबाबतचा अध्यादेश गुपचूप १४ नोव्हेंबरला काढला आहे. यासाठी आदिवासींचे संरक्षण करणाºया पेसा कायद्याच्या तरतुदीत बदल करण्यात आला असून, तो थेट राज्यपालांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील १.१० लाख कोटींचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील ५० हजार कोटींचा मुंबई-नागपूर समृद्धी मार्गासाठीही मोठ्या प्रमाणात आदिवासी जमीन लागणार आहे. शिवाय १२१ किमीचा विरार-अलिबाग कॉरिडोरही आदिवासी जमिनीतून जाणार आहे. परंतु, ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असल्याने हे तिन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणे कठीण होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून विधिमंडळात चर्चा न करता आणि आदिवासी सल्लागार मंडळाची मान्यता न घेताच थेट राज्यपालांच्या घटनात्मक अधिकाºयांचा फायदा घेऊन ग्रामसभेच्या मान्यतेची अटच काढून टाकण्याचा निर्णय विद्यमान युती सरकारने घेतल्याची चर्चा आहे.निर्णय आदिवासींवर अन्यायकारकमहाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आदिवासींवर अन्याय करणारा आहे. पेसा कायद्यानुसार आदिवासी खेड्यांचे अधिकार वाढवून त्यांना संरक्षण देण्यात आले होते. ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असल्याने आदिवासी जमीन सहजासहजी संपादित करता येत नव्हती. मात्र, आता ही अटच राज्यपालांच्या स्वाक्षरीने अध्यादेश काढून रद्द करण्यात आली आहे. यामुळे एकट्यादुकट्या आदिवासीला गाठून धाकदडपशाहीचा प्रयोग करून त्याची जमीन संपादित करणे शासनास सोपे होणार आहे. ही वस्तुस्थिती आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.निकडीच्या प्रकल्पांत यांचा समावेशकेंद्रीय व राज्य महामार्ग, रेल्वे मार्ग, मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रकल्प, गॅस प्रकल्प, पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्यांसह अशा प्रकारच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या मालकीच्या तत्सम प्रकल्पांचा यात समावेश आहे.121 विरार-अलिबाग कॉरिडोरही आदिवासी जमिनीतून जाणार

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई