शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackeray : आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 'धनुष्य' आदित्य ठाकरेच पेलणार? जोरदार मोर्चेबांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 11:10 IST

Aditya Thackeray : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीबरोबरच राज्यात पुढील काळात शिवसेनेच नेतृत्व ठळकपणे आदित्य ठाकरे यांनाच पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

- अल्पेश करकरे

मुंबई : २०२२ या वर्षात मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांतील आगामी निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचे नेतृत्व करत आहेत, पण सध्या उद्धव ठाकरेंची तब्येत आणि भविष्यात निवडणुका पाहता शिवसेनेत निवडणुकांची धुरा आदित्य ठाकरे यांच्या खांद्यांवर असणार आहे. तसेच, आणखी काही काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीबरोबरच राज्यात पुढील काळात शिवसेनेच नेतृत्व ठळकपणे आदित्य ठाकरे यांनाच पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री पद आणि तब्येत यामुळे उद्धव ठाकरेंऐवजी आदित्य ठाकरे...उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्याने आणि तब्येत बरी नसल्याने साहजिकच निवडणुकीचे व्यवस्थापन, रणनीती, उमेदवार निवड व प्रचाराच्या बाबतीत त्यांच्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्यांसाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण व पर्यटन खाते असून ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुंबईतील अनेक विकासकामांमध्ये लक्ष घालणे सुरू केले आहे. मिठी नदी प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मुंबई महापालिकेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न असो, आदित्य ठाकरे हे स्वत: ही कामे करून घेत आहेत. नगरसेवकांच्या कामाचा आढावा देखील ते घेत आहेत.त्याचप्रमाणे राज्यात ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्याठिकाणची ही ते तयारी करत आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची पुढील सूत्रे त्यांच्यात हाती असतील हे जवळपास स्पष्ट आहे.

यापूर्वी अदित्य ठाकरे यांनी केलं होतं नेतृत्वयुवा सेनेचे प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विद्यापीठ व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लढल्या आहेत. त्यात अनेक ठिकाणी शिवसेनेने चमकदार कामगिरी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत अनेक युवा चेहरे सक्रिय झालेले आहेत. महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची धुरा आल्यास भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला ते कशी टक्कर देतात व महापालिकेत शिवसेनेकडून किती नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याबद्दल उत्सुकता आहे.

पुढे आव्हान असणार आहे, त्यामुळे शिवसेना प्रयत्नशीलभाजपशी असलेली युती तुटल्यानंतर आणि राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राज्याच्या सत्तेतून बाहेर ढकलल्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर कमालीचा नाराज आहे. मुंबईची सत्ता ताब्यात घेऊन शिवसेनेला उत्तर द्यायचे, अशी रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी पडद्यामागे सर्व प्रकारची मोर्चेबांधणी सुरू आहे. मनसेला सोबत घेण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनंही वातावरण निर्मिती केली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा गड राखणे हे शिवसेनेपुढे आव्हान असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणी देखील ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे आणि उमेदवार निवडून येतात त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण