शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: आदित्य ठाकरेंकडून सुप्रिया सुळेंची गळाभेट, ताई अजितदादांना म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 08:46 IST

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे.

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. त्याच पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचं विशेष सत्र आज बोलावण्यात आलं असून,  नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात आलं आहे.शपथ ग्रहण समारंभात भाग घेण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार विधानसभेत पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेसुद्धा विधानसभेच्या गेटवर उभ्या राहून येणाऱ्या आमदारांचं स्वागत करत आहेत. त्याच दरम्यान आदित्य ठाकरेंनी विधानसभेत प्रवेश केला असता त्यांनी सुप्रिया सुळेंची गळाभेट घेतली. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनाही आलिंगण देत त्यांचं स्वागत केलं आणि म्हणाल्या दादा शुभेच्छा, त्यामुळे शरद पवार यांच्या कुटुंबातील वाद जवळपास संपल्यात जमा असल्याचीही चर्चा आहे.तत्पूर्वी देवेंद्र फडणवीसांचं औटघटकेचं राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाताच कोसळलं. ज्यांच्या पाठिंब्यावर फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला, त्यावेळी अजित पवार यांनी सगळ्यात आधी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर फडणवीस सरकारनं पत्रकार परिषद मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे.  

  • कुठे जल्लोष, तर कुठे शांतता...

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अल्पमतातील सरकार अखेर पडले, अशी चर्चा त्यांच्यात होती. आमच्याकडेच बहुमत असून सत्याचा विजय झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात शांतता असल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019