शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

दाऊद गँगशी संबंधित महिलेला आदित्य ठाकरे पाठिशी घालतायेत; राहुल शेवाळेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 14:40 IST

मी शिवसेना सोडली त्यानंतर हे प्रकरण जास्त उचलून धरले गेले. लोकांमध्ये माझ्यानावानं अपप्रचार सुरू केला. या संपूर्ण प्रकरणामागे युवासेना प्रमुखच आहेत असं राहुल शेवाळेंनी म्हटलं.

मुंबई - माझ्यावर जी महिला आरोप करतेय ती पाकिस्तानशी ग्रुपशी संबंधित आहेत. ती दाऊद गँगसोबत काम करते. जावेद छोटानी या दाऊदच्या सहकाऱ्यासोबत ती काम करते. त्यामुळे हे प्रकरण साधे नाही. दुबईला जे साक्षीदार आहेत त्यांनी ही महिला पाकिस्तानला २ वेळा जाऊन आल्याचंही म्हटलंय. दाऊद गँगशी संबंधित असलेल्या महिलेला आदित्य ठाकरे पाठिशी घालतायेत. लग्न वाचवण्याचं नाही तर आयुष्यातून उठवण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची NIA कडून चौकशी व्हावी अशी मागणी खासदार राहुल शेवाळेंनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. 

राहुल शेवाळे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाचं दाऊदशी संबंध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. नवाब मलिक हे दाऊदशी संबंधित असल्याबाबत जेलमध्ये आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाचा तपास NIA कडून करावा. ज्यावेळी महाविकास आघाडी होती तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण प्रकरणाची कल्पना होती. त्यांनी अनिल परब यांना माझी बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं. जर मी दोषी असतो तर त्याचवेळी माझ्यावर कारवाई झाली असती. माझी बाजू सत्याची असल्याने मला काही झाले नाही. परंतु मी AU नाव लोकसभेत घेतले त्यामुळे हे प्रकरण पुन्हा उचलून धरले. या प्रकरणाचा तपास NIA माध्यमातून व्हावा अशी मागणी त्यांनी केली. 

त्या महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारीमाझा संसार आणि माझं राजकीय उद्ध्वस्त करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. ज्या महिलेने माझ्यावर आरोप लावलेत त्या महिलेची कॅब्रे डान्सर होती, वडील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. तर महिलेचा भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. दुसरा भाऊ ड्रग्स पॅडलर आहे तर बहिण ही माहिम इथं डान्सबारमध्ये बारगर्ल म्हणून काम करते असं त्या महिलेचे बॅकग्राऊंड आहे. दिल्ली पोलिसांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. एका NGO उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी हे पत्र दिले होते. दिल्ली पोलिसांकडे या गुन्ह्याचे रेकॉर्ड आहेत असंही राहुल शेवाळे पत्रकार परिषदेत म्हणाले. 

महिला करत होती ब्लॅकमेलिंग सदर महिलेला मदत करण्याबाबत दुबईचा माझा मित्र याने सांगितले. कोविड काळात ही महिला भारतात अडकली होती. तिला आर्थिक चणचण भासल्याने रहमान यांनी मदत करावी अशी विनंती केली. या महिलेची अपेक्षा सातत्याने वाढत गेली. त्यानंतर मला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरूवात केली. मी पैसे देणं थांबवले त्यानंतर तिने माझी बदनामी करण्याचं ठरवले. याबाबत मी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दुबईत ही महिला पळून गेल्यानंतर आम्ही दुबई पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. फेक अकाऊंटच्या माध्यमातून ही महिला मला बदनाम करत होती. दुबई पोलिसांनी तपास करत या महिलेला अटक केली. त्यानंतर ८२ दिवस शारजाहच्या जेलमध्ये होती. त्यानंतर ५० हजार गिरम भरून त्या महिलेला दुबईमधून हाकलण्यात आले. ज्यावेळी दुबईवरून ही महिला मला ब्लॅकमेलिंग करत होती. माझ्या पत्नीला धमक्या येत होत्या. त्यावेळी युवासेनेचे पदाधिकारी या महिलेला फॉलो करत होते. त्या महिलेशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते. मी ज्या पक्षात होतो त्याच पक्षाचे लोक महिलेला माझ्याविरोधात उभं केले हे दुर्दैवी आहे असं शेवाळे म्हणाले. 

महिलेचा पोलीस शोध घेतायेत पण सापडत नाही साकीनाका पोलिसांनी मीदेखील तक्रार केली होती. त्यानंतर अंधेरी कोर्टात मी धाव घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण माहिती दिली होती. नेहमीच ही महिला आर्थिक फसवणूक करते असं म्हटलं. तेव्हा अनिल परब यांना सांगून साकीनाका पोलिसांकडे जाऊन संबंधित प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. या प्रकरणात माझा दोष नसल्याने पोलिसांनी तपास केल्यानंतर काहीही तथ्य आढळलं नाही. त्यानंतर महिलेविरोधात साकीनाका पोलिसांनी FIR नोंदवला. परंतु ही महिला आता पोलिसांना सापडत नाही. मध्यंतरी माझ्या पत्नीलाही धमक्या आल्या. दिल्लीला पोलीस गेले पण त्याठिकाणी ही महिला सापडली नाही. या महिलेला पोलीस शोधतायेत. तिला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी पोलिसांसमोर आणावं असं सांगत राहुल शेवाळेंनी रुपाली पाटील ठोंबरे यांना आवाहन केले आहे. 

शिवसेना उबाठा सोडल्यापासून कटकारस्थानमी शिवसेना सोडली त्यानंतर हे प्रकरण जास्त उचलून धरले गेले. लोकांमध्ये माझ्यानावानं अपप्रचार सुरू केला. युवासेना प्रमुखांच्या बाबतीत लोकसभेत मी मागणी केली. राष्ट्रवादीची प्रवक्ते यांनी महिलेला समोर आणले. ज्या महिलेला पोलीस शोधत होते. गेले १ वर्ष मी प्रकरणात मीडियासमोर आलो नव्हतो. या प्रकरणामागे कोण आहे याचा छडा लावत होतो. त्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेच हेच या प्रकरणाच्या मागे आहेत. उबाठा गटाविरोधात मी बोलेन तेव्हा हे प्रकरण काढण्यात येते. दुबईवरून मला ज्या धमक्या येत होत्या तशा राजस्थान, दिल्ली याठिकाणीही FIR दाखल झालाय. शिवसेना सोडल्या कारणाने माझ्याविरोधात कटकारस्थान रचण्यात आले असा दावा राहुल शेवाळेंनी केला. राहुल शेवाळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी कामिनी शेवाळे आणि ज्येष्ठ वकील चित्रा साळुंखे उपस्थित होत्या.  

टॅग्स :Rahul Shewaleराहुल शेवाळेAaditya Thackerayआदित्य ठाकरे