शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्या उमेदवारांच्या मालिकांना मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 19:59 IST

विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या चित्रपट व मालिकांमुळे या उमेदवारांचा प्रचार होतो.त्यामुळे संबंधित मालिका बंद कराव्यात,अशी तक्रार निवडणूक अधिका-यांकडे केली जात आहे.

ठळक मुद्देसी व्हिजील अ‍ॅपच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांच्या विषयीची तक्रार उमेदवारी अर्ज झाल्यानंतर कोणती तक्रार आल्यास स्वरूप पाहून कार्यवाही

पुणे: लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात अनेक अभिनेते उतरले आहेत. मात्र,विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या चित्रपट व मालिकांमुळे या उमेदवारांचा प्रचार होतो.त्यामुळे संबंधित मालिका बंद कराव्यात,अशी तक्रार निवडणूक अधिका-यांकडे केली जात आहे.परंतु,शासकीय वाहिन्या वगळून खासगी वाहिन्यांवर निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या मालिका दाखवता येऊ शकतात,अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे शिरूर लोकसभेतून निडवणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासह सर्वच उमेदवार अभिनेत्यांच्या मालिका सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व सामान्य नागरिकांपासून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच आचासंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सी व्हिजील हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले.या अ‍ॅपच्या माध्यमातून मंगळवारी अमोल कोल्हे यांच्या विषयीची तक्रार करण्यात आली.आचारसंहितेच्या काळात एका खासगी वाहिनीवरील मालिकेमुळे कोल्हे यांचा प्रचार होत आहे.त्यामुळे ही मालिका बंद करावी,असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. अ‍ॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारी 100 मिनिटात निकाली काढणे आवश्यक आहे.त्यामुळे कोल्हे यांच्याबाबत प्राप्त झालेली तक्रार तात्काळ आंबेगाव येथील निवडणूक अधिका-यांकडून निकाली काढण्यात आली.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, आचार संहितेच्या नवीन निमयावतीनुसार एकादा अभिनेता निवडणूक लढवत असल्यास त्याची एखादी मालिका खासगी वाहिनीवर सुरू असेल तर ती थांबवता येणार नाही.मात्र, दूरदर्शन सारख्या शासकीय वाहिन्यांवर अभिनेता असलेल्या उमेदवारांच्या मालिका दाखवता येणार नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही त्यांची मालिका आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार थांबवता येणार नाही. तसेच मंगळवारी सी व्हिजील अ‍ॅपवर प्राप्त झालेली कोल्हे यांची तक्रार निकाली काढण्यात आली आहे. -----------------अमोल कोल्हे यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.यांच्या उमेदवारीबाबतचे कोणतेही कागदपत्र जिल्हा प्रशासनाकडे आलेले नाहीत. उमेदवारी अर्ज झाल्यानंतर त्यांच्याबाबत कोणती तक्रार आल्यास संबंधित तक्रारीचे स्वरूप पाहून त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाईल.- रमेश काळे, अप्पर जिल्हाधिकारी, पुणे  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकCelebrityसेलिब्रिटी