शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भिडेंवर तर होईलच पण, सावरकरांची बदनामी करणाऱ्यांवरही कारवाई; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 06:40 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्राविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. 

मुंबई : संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडण्याचे काम करतात ते योग्य आहे; पण महापुरुषांवर असे वक्तव्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांच्यावर ती कारवाई होईलच; पण स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्राविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. 

काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदींनी भिडेंवर कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांना आलेल्या धमक्यांबाबत म्हणणे मांडले. यशोमती ठाकूर यांना सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येईल व धमकी देणाऱ्याला जेलमध्ये टाकू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अनेक आमदारांना धमकी आल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलाही धमकीचे फोन व ईमेल आले. मी पोलिस तक्रार केल्यानंतर कऱ्हाड पोलिसांनी त्याला अटक करून जामिनावर सोडले. यामागे कोणी सूत्रधार आहे का, असा सवाल त्यांनी केला.

‘ते आम्हाला गुरुजी वाटतात...’  - यावेळी फडणवीस यांनी भिडेंचा गुरुजी म्हणून उल्लेख केल्याने काँग्रेस सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. ते आम्हाला गुरुजी वाटतात. काय अडचण आहे? त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे, असे फडणवीस म्हणाले. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या विरोधात अवमानजनक वक्तव्य केले तर केस फाइल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

परिषदेतही गोंधळ   संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. भाई जगताप यांनी केलेली चर्चेची मागणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी फेटाळून लावली. 

इतिहासात गुंतवून देश, राज्याला मारणे घातकलोकांना इतिहासात गुंतवायचे आणि देश-राज्याचे भविष्य मारायचे हे अत्यंत घातक आहे. आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत बसलो आहोत, अशी टिप्पणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी