शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश नाकारल्यास कारवाई, प्राथमिक शिक्षण विभागाचा इशारा; खासगी इंग्रजी शाळांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 02:46 IST

शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदींनुसार २५ टक्के जागांवर दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना प्रवेश द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम प्राथमिक शिक्षण विभागाकडून खासगी इंग्रजी शाळांना भरण्यात आला आहे.

अमरावती : शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदींनुसार २५ टक्के जागांवर दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना प्रवेश द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम प्राथमिक शिक्षण विभागाकडून खासगी इंग्रजी शाळांना भरण्यात आला आहे.गतवर्षी आरटीईअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेश का नाकारला याचा तपास, तसेचदोषी शाळांवर तत्काळ कारवाई आणि त्याचा अहवाल अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश उपसंचालक विभागाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिले आहेत. यंदा २०१८-१९च्या आॅनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण उपसंचालकांनी विज्ञान सल्लागार आणि शिक्षण उपनिरीक्षक यांना विभाग स्तरावरील नोडल आॅफिसर म्हणून नियुक्त करण्यास सांगितले आहे. या दोन्ही अधिकाºयांची नावे व मोबाइल क्रमांक संचालनालयास येत्या २७ डिसेंबरपर्यंत कळविण्याचे आदेश आहेत. आरटीई प्रवेशाच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागात प्रवेशाचा टक्का अद्यापही कमीच आहे. त्यामुळेच यंदा प्रत्येक तालुक्यात किमान एकतरी तक्रार निवारण केंद्र किंवा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रावर विस्तार अधिकारी समन्वयक म्हणून काम करणार आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी