शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

व्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 5:23 PM

शिवसेनेनं ऑडिओ क्लिप एडिट करून दाखवली. व्हिडीओ क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास निवडणूक आयोगानं माझ्यावर कारवाई करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबई- शिवसेनेनं ऑडिओ क्लिप एडिट करून दाखवली. व्हिडीओ क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास निवडणूक आयोगानं माझ्यावर कारवाई करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. संपूर्ण ऑडिओ क्लिप मी आयोगाकडे सादर केली आहे. साम, दाम, दंड, भेदचा अर्थ हवा असल्यास आम्ही शिकवू, असं थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिलं आहे. मी क्लिप उघड केल्यानं जाणीवपूर्वक क्लीप एडिट करून वापरली.मोदी सरकारच्या कार्यकाळाला 4 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मी 80 टक्के विकास, 20 टक्के राजकारण करतो. निवडणुकीत विरोधक अपप्रचार करतात, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील 3 कोटी 98 लाख कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळालं असून, राज्यात 2 कोटी 18 लाख जनधन खाती सुरू करण्यात आली आहे. 15 हजार ग्रामपंचायती इंटरनेटनं आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. 20 राज्यांत पासपोर्ट कार्यालयं सुरू केल्याचं सांगत केंद्रातील मोदी सरकारचंही तोंडभरून कौतुक केलं आहे.ग्रोथ रेटचा आकडा दरवर्षी वरखाली होत असतो. देशाच्या इतिहासात मागच्या वर्षी भारतात उत्पादन प्रचंड वाढलंय. उत्पादनासह उत्पादकता वाढवण्याची गरज आहे. केंद्रानं चांगल्या योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकार राज्यांना योजना देतो, त्या योजना राबवण्यात राज्यांची महत्त्वाची भूमिका असते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी