शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

आरटीईनुसार प्रवेश न दिल्यास कारवाई-मुख्यमंत्री

By admin | Updated: May 12, 2015 02:08 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश न देणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश न देणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून राज्यात प्रथमच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकशाही दिनाचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्रालयात बसून त्यांनी राज्यातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर निर्देशही दिले. नवी मुंबईच्या पाटणकर दाम्पत्याने त्यांच्या जुळ्या मुलींना शिक्षण हक्क कायद्यानसुार प्रवेश मिळत नसल्याची तक्रार केली होती. जातपडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यात दिलेच पाहिजे, हा कालावधी उलटूनही प्रमाणपत्र न दिलेल्या प्रकरणांची माहिती सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. नाशिकचे किशोर दलाल यांना एक महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्णातील तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समक्ष जावून तक्रारदाराला न्याय मिळवून देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. आजच्या लोकशाही दिनामध्ये आपले सरकार वेबपोर्टलवरील तक्रारींचाही समावेश करण्यात आला. एकूण १७ तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. सामान्यांना विनाविलंब न्याय देण्याची भूमिका घ्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित सचिवांना केले.यावेळी अतिरिक्त मुख्यसचिव डॉ.पी.एस.मीना, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजेय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)