शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंना मदत करणाऱ्या अधीक्षकांवर कारवाई? सुरतवारी झाली पालघर पोलिसांच्या छुप्या संरक्षणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 10:48 IST

सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे विधानभवनातून बाहेर पडले. आपल्या समर्थक आमदारांना दिलेल्या सूचनांप्रमाणे तसेच योजना ठरविल्याप्रमाणे रात्री उशिरा या बंडखोरांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.

हितेन नाईक -पालघर : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदार यांच्या गाड्यांचा ताफा सोमवारी रात्री १०.३०- ११.०० च्या सुमारास तलासरी चेक पोस्टपर्यंत पोहोचल्यानंतर गुजरातपोलिसांच्या आलेल्या ताफ्यासोबत एकनाथ शिंदेगुजरातकडे रवाना झाले होते. या घटनाक्रमात पालघर पोलीस अधीक्षक उपस्थित असल्याने नाकाबंदीच्या नावाखाली पालघर जिल्ह्यातील पोलीस विभागाने गुजरातचा मार्ग एकनाथ शिंदेंना सुलभ बनवून दिल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिंदेंना मदत करणाऱ्या अधीक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे विधानभवनातून बाहेर पडले. आपल्या समर्थक आमदारांना दिलेल्या सूचनांप्रमाणे तसेच योजना ठरविल्याप्रमाणे रात्री उशिरा या बंडखोरांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. बाळासाहेब पाटील हे पालघरला बदली होण्यापूर्वी ठाणे वाहतूक शाखेमध्ये उपायुक्त पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना पालघर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली करून आणण्यात आले. पालघरचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांना ठाणे येथे बदली करून पाठविण्यात आले. यामागे शिंदे यांचाच हस्तक्षेप असून काही महिन्यांपूर्वी तत्कालीन अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांची गृह विभागाने केलेली बदली शिंदे यांनी थांबवली होती. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा प्रवास विनाअडथळा गुजरातच्या दिशेने पार पडावा यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत आच्छाड चेकपोस्टवर नाकाबंदी ठेवल्यामुळे याला दुजोरा मिळत आहे. दरम्यान, या घटनेबाबत पालघर पोलिसांकडे अधिक चौकशी केली असता जिल्ह्यात सोमवारी रात्री अचानक नाकाबंदी जाहीर करण्यात आली होती, त्याप्रमाणे सर्व अधिकारी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी गस्त घालत होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक हेदेखील नाकाबंदीच्या गस्ती वर फिरत होते, असे सांगण्यात आले.

नाट्याबाबत सत्ताधाऱ्यांना उशिरा जागशिंदे व अन्य सर्व आमदार हे त्यांना राज्यातील पोलिसांचे संरक्षण असताना परराज्यात जात असताना गुप्त विभागाला याची माहिती मिळाली नाही असे होऊ शकत नाही. बंडखोरीच्या या  नाट्याबाबत सत्ताधारी पक्षाला आता उशिरा जाग आली असून त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शिंदेंना मदत करणाऱ्या पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यावरही कारवाई होते की नाही, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाPoliceपोलिसGujaratगुजरात