मुंबई : महापालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभागातील ना. सी. फडके मार्गाच्या कडेला असणाऱ्या ६0 अनधिकृत बांधकामांवर आज हातोडा पडला. या बांधकामांमुळे रस्ता रुंदीकरणासह पर्जन्यजल वाहिन्यांची कामे रखडली होती. परिमंडळ ४चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. यासाठी डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे व त्यांच्या ३६ जणांच्या चमूचे सहकार्य महापालिकेच्या पथकाला लाभले. सहायक अभियंता संजय बोरसे, दुय्यम अभियंता रमेश गिरगावकर व कनिष्ठ अभियंता विक्की शर्मा यांच्यासह महापालिकेच्या १५ जणांच्या चमूने ही कारवाई केली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त पराग मसुरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
६० अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By admin | Updated: September 5, 2016 04:46 IST