शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना सन्मानपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:38 IST

आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांपैकी जे मानधन घेतात आणि घेत नाहीत अशा सर्वांना सन्मानपत्र दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

 मुंबई : आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांपैकी जे मानधन घेतात आणि घेत नाहीत अशा सर्वांना सन्मानपत्र दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. या बंदीजनांचे मानधन वाढविण्याचा भविष्यात निश्चितच विचार केला जाईल, असे ते म्हणाले.१९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरावा, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अजित पवार यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी सदस्य पराग अळवणी, सुभाष (पंडित) पाटील, शशिकांत शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. माझे वडील, काका त्यावेळी तुरुंगात होते, आज ते नाहीत पण माझी वयोवृद्ध आई आहे. ती मानधन घेत नाही पण सरकारने तिला वा तिच्यासारख्यांना सन्मानपत्र तरी द्यायला हवे, असे शेकापचे सुभाष पाटील म्हणाले. त्यावर सन्मानपत्र देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत तुरुंगवास भोगलेल्यांना ५ हजार, तर महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंदीजनांना १० हजार मानधन देण्यात येते. बंदीजनाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबास अनुक्रमे अडीच हजार व पाच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. आतापर्यंत ३२६७ जणांना मानधन मंजूर करण्यात आले आहे.हे मानधन मिळण्यात अडचणी येणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबत विशेष लक्ष देण्यास सांगितले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस