शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गुवाहाटीतून शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परतेलेले आमदार नितीन देशमुखांना ACB ची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 17:37 IST

१७ तारखेला अमरावतीत लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस दिली आहे.

अमरावती - ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना ACB नं नोटीस बजावली असून १७ जानेवारीला देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी ठाकरे गटाचे राजन साळवी यांना एसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. आता नितीन देशमुखांना एसीबीनं नोटीस बजावल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

याबाबत आमदार नितीन देशमुख म्हणाले की, १७ तारखेला अमरावतीत लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस दिली आहे. मालमत्तेच्या विवरण पुराव्यासोबत हजर राहण्यास सांगितले आहे. १७ तारखेला मी रितसर कार्यालयात हजर राहीन. आरोप कुणी करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. एका आमदाराला नोटीस देताना तक्रार कुणी दिली याचा उल्लेख नाही. माझ्याजवळील कुठली प्रॉपर्टी अवैध आहे याचीही माहिती नाही. याबाबत मी लेखी खुलासा १७ तारखेला चौकशीसाठी हजर झाल्यावर करेन असं देशमुखांनी स्पष्ट केले. 

त्याचसोबत तक्रारकर्त्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर मला नोटीस दिली आहे. ज्यावेळी तक्रारकर्त्याचे नाव समोर येईल तेव्हा सगळे स्पष्ट होईल. तक्रारकर्त्याला कुणी तक्रार देण्यास भाग पाडलं. तक्रार कुणी द्यायला लावली हे सर्व मी पुराव्यानिशी सादर करेन असं सांगत नितीन देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

कोण आहेत नितीन देशमुख?नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. गत तीन टर्मपासून भारिप-बमसंकडे असलेल्या या मतदारसंघात नितीन देशमुख यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. राज्यातील सत्तानाट्यात नितीन देशमुखांचे नाव प्रामुख्याने समोर येते. एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले नितीन देशमुख हे तिथून सुटून थेट उद्धव ठाकरेंकडे पोहचले होते. ठाकरेंकडे पोहचताच नितीन देशमुखांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. 

एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजपानेच हे षडयंत्र रचले आहे, असा आरोप आमदार नितीन देशमुखांनी करत मी निवडून आलो असलो तरी शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे त्यामुळे मी निष्ठावान शिवसैनिक, प्राण असेपर्यंत शिवसेनेशी इमान कायम ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मुंबई, सुरत, गुवाहाटी ते नागपूर असा संपूर्ण घटनाक्रम विशद करून आ. देशमुख यांनी हा सगळा प्रकार भाजपानेच घडवून आणल्याचा दावा केला होता.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNitin Deshmukhनितीन देशमुख