शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

एसीबीने घराचे क्षेत्रफळ वाढवून दाखविले !

By admin | Updated: June 18, 2015 08:55 IST

आपण राहत असलेल्या मुंबईतील सुखदा सोसायटीतील फ्लॅट ६५० ते ७०० फुटाचा असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या प्रसिद्धी पत्रकात सदर

अतुल कुलकर्णी , मुंबईआपण राहत असलेल्या मुंबईतील सुखदा सोसायटीतील फ्लॅट ६५० ते ७०० फुटाचा असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या प्रसिद्धी पत्रकात सदर घराचे क्षेत्रफळ २,००० चौरस फूट असल्याचे म्हटले आहे, असे सांगत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एसीबीच्या प्रेसनोटवर आक्षेप घेतला आहे. सुखदा सोसायटीत नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांचेही फ्लॅट तेवढेच आहेत, अशी पूरक माहितीही त्यांनी दिली.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भुजबळांनी आपल्या मालमत्तेसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, मानेक महल येथील जागा पंकजच्या पणजीने मृत्युपत्राद्वारे त्याला दिली असून, त्याचे क्षेत्रफळ ८०० फुटाचे आहे. मात्र एसीबीच्या प्रेसनोटमध्ये १,२०० फूट दाखवले गेले. माझगाव येथील ७०० चौ. फुटाचे घर आपल्या ३८ वर्षांपूर्वी वारलेल्या दिवंगत भावाने त्यांच्या पत्नीच्या नावाने म्हणजे आपल्या वहिनींच्या नावाने घेतले आहे. तेथे आता आमचे भाचे राहतात. तेथे समोरच माझा फ्लॅट साधारणपणे ४५० चौरस फुटाचा आहे. तो ३० वर्षांपूर्वी घेतला आहे.नाशिक येथे आमच्या मामाची ७ एकर जिरायत जमीन त्या वेळी नाशिक शहराच्या ५ मैल बाहेर होती. माझ्या वहिनी मामाच्या कन्या आहेत. ही जमीन ३५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान टप्प्याटप्प्याने १५ हजार रुपये एकराने आमच्या नावे करण्यात आली. त्या वेळी तेथे सिडको अथवा एकही घर आजूबाजूला नव्हते. आता ती जमीन शहराच्या मध्यभागी आली. तेथे आम्ही २५ वर्षांपूर्वी फार्म हाऊस बांधले. आता कुटुंब वाढल्याने नवीन घर बांधायला घेतले. त्या घरात मोठे कोर्ट यार्ड आहे. मोठे पोर्च आहे. तिन्ही बाजूला मोठे वऱ्हांडे आहेत. हे धरून साधारणपणे ३० हजार चौ. फूट एकूण क्षेत्र होते. आता या घराच्या बांधकामासाठी १,५०० रु. फूट आणि फर्निचर व इतर गोष्टीसाठी ३,००० फूट खर्च येईल. हे पाहाता याची किंमत साधारणपणे १० कोटी होऊ शकते. ती एकदम १०० कोटी दाखविण्यात आली आहे.सांताक्रूझ येथील मालमत्ता जेथे पंकज आणि समीर राहतात, ही मालमत्ता कुणाची व्यक्तिगत नाही. मुंबईत जुन्या इमारतींच्या रिडेव्हलपेमेंट योजनेखाली अनेक विकासक करतात त्याप्रमाणे येथील जुन्या चाळीचे रिडेव्हलपेमेंट केले आहे. त्यातील काही घरे जुन्या भाडेकरूंना देऊन बाकीची विकणे आहे. तूर्त त्या विकाऊ सदनिकेत पंकज व समीर राहतात. येवला येथे माझे आणि मनमाड येथे आ. पंकज यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून संपर्क कार्यालय असून, तेच राष्ट्रवादी पक्षाचेही कार्यालय आहे. त्याप्रमाणे मतदारसंघात मुक्काम करण्याच्या दृष्टीने तेथे निवासाची सोय आहे. काळाच्या ओघात या सर्व मालमत्तांच्या किमती वाढल्या. आम्ही हे सर्व इन्कम टॅक्स व इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केले आहे. आजही पोलिसांना आम्ही सर्व जुनी कागदपत्रे, नोंदी दाखवण्यास तयार आहोत; परंतु दुर्दैवाने त्या अगोदरच आमच्या विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी सांगितलेल्या किमती गृहीत धरून त्यांना प्रसिद्धी दिली जात आहे. चौकशी जरूर करा, पण आम्ही न केलेले गुन्हे आमच्यावर लादून बदनामी करू नका, असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.