शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीशांच्या स्वागतावेळी अनुपस्थिती, प्राेटाेकाॅल भंग; कारवाईची बार कौन्सिलची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:38 IST

१८ मे रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई विमानतळावर आले असता अधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल न्या. भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ‘सरन्यायाधीश’ पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभावेळी राज्यशिष्टाचाराचा भंग करण्यात आला. मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्त सरन्यायाधीशांच्या स्वागतास अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाने मुख्य न्या. आलोक आराधे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.१८ मे रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई विमानतळावर आले असता अधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल न्या. भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती.

समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून... न्यायसंस्थेचा प्रमुख, त्यात पुन्हा त्याच राज्यातील व्यक्ती विमानतळावर उतरल्यानंतर मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त कोणीही उपस्थित राहिले नाहीत. त्यांची वागणूक योग्य आहे का? असा सवाल सरन्यायाधीशांनी केला होता. त्याची दखल घेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाने मंगळवारी ठराव पारित केला.राजशिष्टाचार न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाईल, असे पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनाही पत्रविमानतळावर न्या. गवई यांच्या स्वागतासाठी आलेल्या बार कौन्सिलच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्षांना प्रवेश न दिल्याने त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र बार कौन्सिलने मुख्य न्या. आलोक आराधे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय