शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

देशात बहुमताची चेष्टा : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:04 PM

पंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला.

ठळक मुद्देदेशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी शेतकºयांच्या माथ्यावर मारून सरकार सध्या बहुमताची चेष्टा करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला. देशातील ९६ टक्के कष्टकरी असुरक्षित आहेत. तरुण दिशाहीन असल्याने देशाचे भवितव्य अधांतरी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पंढरपूर येथे शेतकरी सुकाणू समितीच्या राज्यव्यापी परिषदेसाठी ते आले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाबा आढाव यांनी देशात, राज्यात सध्या सुरू असलेले विविध समाजाचे मोर्चे, शेतकºयांचा उद्रेक, कष्टकरी, असंघटित कामगारांचे विविध प्रश्न, शेतकºयांचा हमीभाव, कर्जमाफी या विषयी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.प्रत्येक राज्यात सुरू असलेले आरक्षणासाठीचे मोर्चे, सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेला शेतकºयांचा उद्रेक, असंघटित कामगारांच्या समस्या, देशात वाढत असलेली विषमता, दुष्काळसदृश परिस्थिती याशिवाय अनेक मूलभूत सुविधांसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. बहुमतातील सरकारने एकहाती निर्णय घेऊन या सर्वांना दिलासा देणे गरजेचे आहे, पण तसे न करता सरकार जाणीवपूर्वक मोर्चे मोडून काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे, असे बाबा आढाव म्हणाले.---------------------कणखर भूमिका घ्यावीमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशाच्या, राज्याच्या राजकारणात गेल्या ५० वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र वेळोवेळी तडजोड, आघाडीच्या राजकारणामुळे त्यांच्यासह शेतकरी, कष्टकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या परराज्यातील लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते कणखर भूमिकेमुळे त्या राज्यांचे हित जोपासत आहेत. तशीच कणखर भूमिका शरद पवारांनी घेतल्यास त्यांच्या अनुभवाचा शेतकरी, कष्टकºयांना निश्चित लाभ होईल, असे बाबा आढाव म्हणाले.