शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूरबाबत उद्या मुंबईत चर्चासत्र

By admin | Updated: June 3, 2015 23:40 IST

अमजद बोरकर : देशातील नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

राजापूर : देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प जैतापुरात माथी मारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प चांगला असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात तो प्रकल्प सर्वांसाठी घातक आहे. त्यातील भयानकता केवढी आहे, याचा पर्दाफाश करण्यासाठी शुक्रवार, ५ जूनला मुंबईत खास चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये नामवंत शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मच्छिमार नेते अमजद बोरकर यांनी दिली.सुमारे १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापुरात मार्गी लागत आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. त्या प्रकल्पातून होणाऱ्या रेडीएशनमुळे मानवी जीवनासह वनस्पती, बागायती, भातशेती व मच्छिमारीवर कमालीचा परिणाम होणार आहे. परिणामी कोकण भूमीच नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.या प्रकल्पातील शीतलीकरणासाठी प्रतिदिन ५ हजार २०० कोटी लीटर समुद्राचे पाणी वापरले जाणार आहे. त्यानंतर ५ ते ७ डिग्री सेंटीग्रेडचे तप्त पाणी पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार असल्याने समुद्रातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. त्यामुळे मच्छी उत्पादन नष्ट होऊन समस्त मच्छिमार देशोधडीला लागणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.दुसरीकडे चतुर्वेदी समितीच्या अहवालानुसार संपूर्ण जांभ्या दगडाचा सडा तोडून बेसॉल्ट रॉकच्या पातळीपर्यंत येण्यासाठी समुद्राच्या पातळीपर्यंत खाली जावे लागणार असल्याने त्सुनामीचादेखील धोका संभवतो. असे विविध धोके समोर दिसत असताना आमचे सरकार मात्र हा प्रकल्प सुरक्षित असल्याचा आव आणत असल्याचा आरोप बोरकर यांनी केला.शासनाचे शास्त्रज्ञसुद्धा त्याचीच री ओढण्यात गुंतले असून, देशपातळीवरील हा प्रकल्प घातकच असल्याचे सांगताना यापूर्वी अनेक शास्त्रज्ञांनी जैतापूर परिसराला भेट देताना याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला होता. पण शासन मात्र त्यांचे ऐकायला तयार नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतीय पर्यावरण चळवळ या संस्थेचे अ‍ॅड. शिरीष राऊत यांनी पुढाकार घेतला असून, शुक्रवारी, ५ जूनला सायंकाळी ६ वाजता दादरच्या धुरु हॉल सभागृहात जैतापूर प्रकल्पावर चर्चासत्र व मार्गदर्शनाचा कार्यक़्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला डॉ. सुरेंद्र गाडेकर, डॉ. शशी मेनन, डॉ. व्ही. मुगा झेंथी, शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)