शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तार राज्याचे कृषीमंत्री, तर संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन खात्याचा कार्यभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 17:50 IST

खातेवाटपात मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर उपमुख्यमंत्र्यांकडे सात खात्यांचा कार्यभार.

काही दिवसांपूर्वीच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये शिवसेनेच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना खातेवाटप जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खात्यांचा कार्यभार असेल, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ सारख्या महत्त्वाच्या सात खात्यांचा कार्यभार असणार आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार हे आता राज्याचे नवे कृषीमंत्री असतील, तर संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती असतील याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाख शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार या खात्यांचा कार्यभार असेल. काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. परंतु या विस्तारात महिला आमदारांना संधी देण्यात आली नव्हती.

हेही वाचा -  मोठी बातमी : फडणवीसांकडे गृह, तर विखेंकडे महसूल; शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारSanjay Rathodसंजय राठोडEknath Shindeएकनाथ शिंदे