शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अबब.. १० वर्षाच्या मुलीच्या पोटातून काढले चक्क अर्धा किलो केस, तीन तास चालली शस्त्रक्रिया

By नरेश रहिले | Updated: November 27, 2022 15:09 IST

Gondia News: लहानपणात कुणी माती खातो, कुणी चूना, खडू, राखड खातात परंतु गोंदिया जिल्ह्यातील एका मुलीने चक्क केस खाल्ले. ते केस एक, दोन किंवा पाच नाही तर तब्बल ५०० ग्रॅम केस खाल्ले.

- नरेश रहिलेगोंदिया _ लहानपणात कुणी माती खातो, कुणी चूना, खडू, राखड खातात परंतु गोंदिया जिल्ह्यातील एका मुलीने चक्क केस खाल्ले. ते केस एक, दोन किंवा पाच नाही तर तब्बल ५०० ग्रॅम केस खाल्ले. यामुळे तिच्या पोटता अन्न जाईना. डॉक्टरांकडून तपासणी केल्यावर तिच्या पोटात चक्क केसांचा गोळा जमा झाला हाेता. गोंदियाच्या द्वारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या दहा वर्षाच्या मुलीच्या पोटातून तो अर्धा किलो केसांचा गुच्छा शस्त्रक्रीया करून काढण्यात आला.

तिरोडा तालुक्याच्या करटी येथील एका दहा वर्षाच्या मुलीला मागील तीन वर्षापासून भूक न लागणे, पोट दुखणे, उलटी होणे हा त्रास होत होता. त्याकरिता तिच्या वडिलांनी तिला तिरोडा येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हितेश मंत्री यांना दाखविले. त्यांनी त्या मुलीची सोनोग्राफी काढली असता पोटात काहीतरी वेगळी वस्तू असल्याचे कळले. त्यांनी तिला पुढील उपचाराकरिता गोंदिया येथे रेफर केले. द्वारका ल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. विभू शर्मा यांच्याकडे पाठविले. डॉ. शर्मा यांनी तिची तपासणी केली व सविस्तर विचारपूस केली असता ती लहानपणी केस खायची असे तिच्या वडिलांनी सांगितले. परंतु आता तिने केस खाणे बंद केले आहे, असेही सांगितले.

डॉ. शर्मा यांनी तिच्या पोटाचे सिटीस्कॅन काढले असता पोटात केसांचा गुच्छ असून तो आतड्यात गुंतलेला असल्याचे लक्षात आले. त्या मुलीची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे होते. शस्त्रक्रीया करतांना मुलीच्या जीवाला पण धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांच्या संमतीने ही शस्त्रक्रिया डॉ. अविनाश येळणे, डॉ, यामीनी येळणे यांच्या मार्गदर्शनात डॉ. विभू शर्मा यांनी डॉ. श्रद्धा शर्मा यांच्या मदतीने बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. नरेश येरणे यांच्या सोबत २४ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून अर्धा किलो केसांचा गुच्छा त्या मुलीच्या पोटातून काढला. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती बरी आहे. तिला लवकरच रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी राहुल कावरे व नेहा खोब्रागडे यांनी सहकार्य केले.

केस खाणे हा एक मानसिक आजार असून त्याला याचे प्रमाण फार कमी आहे. हा आजार क्वचितच आढळताे. त्या मुलीची यशस्वी शस्त्रक्रीया झाली असून या शस्त्रक्रियेला तीन तासाचा वेळ लागला आहे.-डॉ. विभू शर्मा, बाल शल्यचिकित्सक गोंदिया.

टॅग्स :docterडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र