शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत ओबीसीसाठी २९ जुलैला आरक्षण सोडत; वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 05:26 IST

महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढताना, आधीचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील इतर मागसवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सोडत काढण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

निवडणूक होऊ घातलेल्या महापालिकांसाठी येत्या २९ जुलैला तर जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकांसाठी २८  जुलै, २०२२ रोजी ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढण्याचे आदेश शुक्रवारी  दिले. त्यानुसार,  सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून  ओबीसी, ओबीसी महिला आणि  सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नव्याने सोडत काढण्यात येईल.  मुंबई महापालिकेत २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार, ओबीसींसाठी ६३ जागा राखीव असतील.

महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढताना, आधीचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम राहणार आहे. ओबीसी आरक्षण सोडतीची प्रक्रिया ५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, याशिवाय  आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले  आहेत.  

यासाठी निघणार आरक्षण सोडत

महापलिका : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर. 

टॅग्स :BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२२Electionनिवडणूक